Delhi excise policy case | Amit Palekar  Gomantak Digital Team
गोवा

Delhi excise policy case: मनी लाँडरिंग प्रकरण! ईडीचे आप गोवा संयोजक अमित पालेकर यांच्यासह तिघांना समन्स

Delhi excise policy case: संचालनालयाने सर्वांना गुरुवारी (28 मार्च) ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Pramod Yadav

Delhi excise policy case

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी गेल्या आठवड्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलीय.

अंमलबजावणी संचालनालय सातत्याने आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर छापे टाकत असताना, गोव्यातील आप नेत्यांना ईडीने समन्स बजावला आहे. यात गोव्याचे आप संयोजक अमित पालेकर यांच्यासह तिघांचा समावेश आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत आप गोवा संयोजक अमित पालेकर, रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांना समन्स बजावले आहे.

संचालनालयाने सर्वांना गुरुवारी (28 मार्च) ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्यातील पैसा आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरल्याचा आरोप ईडीने केला आहे. यासंबधित सर्वांची चौकशी केली जाऊ शकते.

दरम्यान, आपच्या दीपक सिंगला यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दीपक सिंगला हे दुसरे आप नेते ठरले आहेत. दीपक सिंगला यांचे गोव्याशी संबंध असल्याने हा छापा कथित दारू घोटाळ्याशी असू शकतो, असे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

SCROLL FOR NEXT