ED Dainik Gomantak
गोवा

ED चा 2 खाण कंपन्यांना दणका; 'एवढ्या' कोटींची मालमत्ता केली जप्त

ही फसवणूक खाण खात्याचे अधिकारी व खाणपट्टे धारकांच्या संगनमताने झाल्याने ‘ईडी’ने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील बेकायदा खाण व्यवसायप्रकरणी क्राईम ब्रँचने केलेल्या तपासकामाच्या आधारे दिल्लीच्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मे. मॅग्नम मिनरल्स तसेच काडणेकर आणि कुटुंब यांची सुमारे 13.38 कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली जप्त केली आहे.

राज्यातील क्राईम ब्रँचने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली काही खाणपट्टेधारक तसेच खाण ऑपरेटर्सनी केलेल्या बेकायदा खनिज उत्खननप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांचा तपास करताना खाणमालकांनीच खाण खात्याशी संगनमत करून फसवणूक केल्याचे ‘ईडी’ला आढळून आले आहे.

खाण खात्याशीही संगनमत

ही फसवणूक खाण खात्याचे अधिकारी व खाणपट्टे धारकांच्या संगनमताने झाल्याने ‘ईडी’ने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मे. मॅग्नम व काडणेकर आणि कुटुंबाच्या स्थावर व जंगम मालमत्तेबाबत तपास सुरू केला होता.

त्यांनी जमा केलेल्या या मालमत्तेचा मनी लाँडरिंग प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयाने ती जप्त केली आहे. ‘ईडी’ने केलेल्या या कारवाईतून 1.04 कोटींची स्थावर, तर 12.34 कोटींची जंगम मालमत्ता जप्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT