ED seized property in Goa  Dainik Gomantak
गोवा

ED in Goa: मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात 'ईडी'ची गोव्यात कारवाई; वाधवान बंधुंची 31.50 कोटींची मालमत्ता जप्त

खासदार संजय राऊत या प्रकरणात संशयित आरोपी

गोमंतक ऑनलाईन टीम

ED in Goa Patra Chawl Case: महाराष्ट्रातील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सोमवारी सक्तवसुली संचलनालयाने गोव्यातील 31.50 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली.

ही मालमत्ता गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीच्या नावावर असून ही कंपनी राकेश वाधवान आणि सारंगकुमार वाधवान यांची आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत या प्रकरणात संशयित आरोपी आहेत. या प्रकरणात राऊत यांना तुरूंगातही जावे लागले होते.

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकल्पाची पुनर्विकासाची जबाबदारी वाधवान यांच्या कंपनीकडे होती. यात एकूण 672 भाडेकरू होते.

करारानुसार 672 भाडेकरूंना सदनिका, म्हाडासाठी काही सदनिका आणि उर्वरीत सदनिकांची विक्री असे ठरले होते.

पण कंपनीच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून 9 विकसकांना एफअसआय विकला आणि 900 कोटींची कमाई केली. तसेच भाडेकरूंना सदनिका दिल्या नाहीत. याशिवाय बेकादेशीर कामांतून संचालकांनी एक हजार कोटी कमावल्याचा ईडीचा आरोप आहे.

2011 ते 2016 या काळात राकेश वाधवान यांच्या खात्यातील 38.5 कोटी रूपये इंडिया बुल्स फायनान्सच्या 28.5 कोटींच्या कर्जाच्या हप्त्याच्या पूर्व पेमेंटसाठी वापरले गेले.

या कर्जातून उत्तर गोव्यात 31.50 कोटी रूपये किंमतीचे 1250 चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन भूखंड आणि 15300 चौरस मीटरचा भूखंड सारंग वाधवान यांनी वैयक्तिक खात्यातून खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement: 23 वर्षांचा प्रवास, असंख्य जागतिक रेकॉर्ड! ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती; कोट्यवधी चाहत्यांचे पाणावले डोळे VIDEO

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.57 की 3? आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार? थकबाकीचं संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Crime: दोन्ही हातांत कोयते घेऊन दहशत; कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलिसांना धमकावणारा तरुण ताब्यात

Stray Dog Management: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनात दिरंगाई; 8 पंचायत सचिवांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Goa Agriculture: गोव्याचा पारंपरिक कृषी वारसा धोक्यात? नारळ प्रक्रिया आणि मीठ उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारकडे साकडे

SCROLL FOR NEXT