ED | Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case: जमीन हडपप्रकरणी गोव्यात EDची मोठी कारवाई, रोहन हरमलकरच्या 1600 कोटींच्या मालमत्तेचे दस्तऐवज जप्त

ED Investigation Rohan Harmalkar: ईडीने गुरुवारी (24 एप्रिल) आणि शुक्रवारी (25 एप्रिल) असे दोन दिवस गोव्यात अनेक ठिकाणी छापे टाकून मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) 2002 अंतर्गत राज्यात गाजलेल्या जमीन हडप प्रकरणाशी संबंधित छापे टाकून ही शोधमोमहीम राबवली.

Manish Jadhav

पणजी: राज्यातील जमीन हडपप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनेक ठिकाणी छापे टाकून एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्तेची कागदपत्रे तसेच या घोटाळ्यातील मास्टरमाईंड रोहन हरमलकर याच्याकडून सुमारे 600 कोटींच्या जमीन व्यवहारांसंदर्भातील दस्तऐवज जप्त केले. या दोन्ही कारवाईमध्ये ईडीने सुमारे 1600 कोटींच्या मालमत्तेचा दस्तऐवज जप्त केले.

ईडीने गुरुवारी (24 एप्रिल) आणि शुक्रवारी (25 एप्रिल) असे दोन दिवस गोव्यात अनेक ठिकाणी छापे टाकून मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) 2002 अंतर्गत राज्यात गाजलेल्या जमीन हडप प्रकरणाशी संबंधित छापे टाकून ही शोध मोहीम राबवली.

ईडीने आर्थिक तपासाच्या आधारे या जमीन हडपप्रकरणात रोहन हरमलकर ही व्यक्ती प्रमुख सूत्रधार असून त्याने इतर सहकाऱ्यांसह तोतयागिरी, बनावट कागदपत्रे तयार करणे, महसूल नोंदीमध्ये छेडछाड करणे इत्यादी फसव्या मार्गांनी मूळ मालकाच्या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावण्याचा कटकारस्थान केले. मूळ जमीन मालक आणि त्यांच्या कुटुंबियाच्या मालकीच्या मालमत्ता त्यांच्या संमतीशिवाय बेकायदेशीरपणे विकल्या गेल्या, ज्यामुळे पीडितांना गंभीर आर्थिक आणि कायदेशीर त्रास झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT