Deepak Singla Dainik Gomantak
गोवा

ED Raid: आपच्या आणखी एका नेत्यांच्या अडचणी वाढणार; गोवा प्रभारींच्या घरावर ईडीची छापेमारी

Delhi excise policy case Goa Connection: ईडीने आपचे माजी विधानसभा उमेदवार आणि गोवा प्रभारी दीपक सिंगला यांच्या घरावर छापेमारीस सुरुवात केली आहे.

Pramod Yadav

Delhi excise policy case Goa Connection

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी सध्या अंमलबजावणी संचालनालय सातत्याने आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर छापे टाकत आहे.

याबाबत अंमलबजावणी संचालनालयाचे पथक सातत्याने कारवाई करत आहे. यात आता ईडीने आपचे माजी विधानसभा उमेदवार आणि गोवा प्रभारी दीपक सिंगला यांच्या घरावर छापेमारीस सुरुवात केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दीपक सिंगला हे दुसरे आप नेते आहेत ज्यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. दीपक सिंगला यांचे गोव्याशी संबंध असल्याने हा छापा कथित दारू घोटाळ्याशी असू शकतो, असे मानले जात आहे.

हवालाद्वारे 45 कोटी रुपये गोव्यात पाठवण्यात आल्याचा दावा ईडीने पीएमएलए कोर्टात केला होता. कथित घोटाळ्यातील पैसा आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरल्याचा आरोप ईडीने केला आहे.

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणात आम आदमी पार्टीला 100 कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याचा दावा ईडीने केला. 'आप'ने हा पैसा पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीत वापरला.

या घोटाळ्यात केवळ 100 कोटी रुपयांची लाच नव्हे मिळणाऱ्या नफ्यावर कमिशनही घेतले जी रक्कम 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, असा दावा ईडीने केलाय.

दक्षिण ब्लॉककडून मिळालेले 45 कोटी रुपये आम आदमी पक्षाने 2021-22 गोवा निवडणूक प्रचारात वापरले. यासोबतच एजन्सीने हवालाकडे बोट दाखवत हे पैसे 4 मार्गांनी गोव्यात पोहोचल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: पिळगावचे शेतकरी एकवटले, वेदान्ता खाणीचा रस्ता अडवला; रस्त्यात उभारली झोपडी

IFFI Goa 2024: यंदाच्या इफ्फीत खास कार्यक्रमाचे आयोजन; 'इफ्फीएस्टा' करणार उपस्थितांचे मनरिजवण

Bhoma Flyover: गडकरीजी, देवी सातेरी आणि तिच्या भावाची ताटातूट थांबवा; गोव्यातल्या ग्रामस्थांची आर्त हाक

IFFI Goa 2024: आता तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही, असं करा बुकिंग आणि चित्रपटांचा आनंद घ्या

Goa Today's News Live: IFFI च्या उद्घाटन समारंभाला सुरुवात, बॉलीवूडचे दिग्गज कलाकारांची हजेरी

SCROLL FOR NEXT