Ganeshotsav 2024|Plastic Decoration  Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांचे ‘हरित चतुर्थी’चे आवाहन; लोकांची मात्र ‘प्लास्टिक’लाच पसंती, स्वस्त आणि टिकाऊ खरेदीकडे भर

Ganesh Chaturthi 2024: हरित चतुर्थी साजरी करावी असे मुख्यमंत्री सावंत यांना वाटत असले तरी बाजारतील स्थिती पाहता ते कितपत साध्य होईल हे सांगणे खूप कठीण आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Eco Friendly Festival|Harit Chaturthi

पणजी: यंदा ‘हरित चतुर्थी’ साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे. या उत्सवात मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचे पालन किती लोक करतील, हा संशोधनाचा भाग असला तरी बाजारात प्लास्टिक फुलांच्या, वस्तूंनी दुकाने सजली आहेत.

गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवात दिवसेंदिवस प्लास्टिक वस्तूंचा वापर वाढला आहे, त्यामुळे राज्यातील जनतेने हरित चतुर्थी साजरी करावी, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना वाटत असले तरी बाजारतील स्थिती पाहता ते कीतपत साध्य होईल, हे सांगणे खूप कठीणच आहे.

यंदाचा गणेशोत्सव स्वयंपूर्णतेचा असावा, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भर दिला आहे. गोव्यात गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण असल्यामुळे हा उत्सव पारंपरिक आणि ‘प्लास्टिक’मुक्त करावा, असे मुख्यमंत्र्यांना वाटते. त्यामुळेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीही खरेदी करणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. प्लास्टिकच्या वस्तू किंवा प्लास्टिक फुलांच्या माळा सजावटीसाठी वापरावर अनेकजण भर देतात. या माळा स्वस्त आणि टिकाऊ असल्याने लोक त्यांच्या खरेदीला पसंती देतात.

बाजारात मिळणाऱ्या प्लास्टिकच्या माळा व्यवस्थित ठेवल्यास अनेक वर्षे टिकतात, हाही त्याच्या खरेदीचा फायदा असल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी प्लास्टिक टाळण्याचे आवाहन केले असले तरी महागाईच्या काळात दररोज मोठ्या प्रमाणात नैसर्गिक फुलांच्या माळा सजावटीसाठी खरेदी करणे कोणाला परडवणार नाही, असेही त्या व्यवसायिकाचे म्हणणे आहे.

लोकांची ‘प्लास्टिक’लाच पसंती

पणजीसह इतर महत्त्वाच्या बाजारपेठांत प्लास्टिकच्या फुलांच्या माळा तसेच इतर वस्तू, चायनीज बल्बच्या माळा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या आहेत. प्लास्टिकच्या फुलांच्या माळा विविध रंगी आणि आकर्षक दिसतात. त्याशिवाय विद्युत रोषणाईमध्ये या माळांची सजावट आकर्षक दिसते, त्यामुळेच लोक त्यांच्या खरेदीसाठी पसंती देतात.

नैसर्गिक वस्तू महागणार

बाजारात या फुलांच्या माळा १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्याशिवाय इतर वस्तूंच्या किमतीही शंभराच्या पटीतच आहेत. माटोळीला लागणाऱ्या वस्तू लोक पूर्वीप्रमाणे खरेदी न करता आता आपल्या ऐपतीप्रमाणे खरेदी करतात. अनेक नैसर्गिक फळांचे जिन्नस यावर्षी महागण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे येथील विक्रेत्यांचे म्हणेणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT