Fire Service Week : अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त शुक्रवारी (ता.२१) बेतूल येथील इपशेम, ओएनजीसीमध्ये भूकंप झाल्यास काय करावे, त्याबद्दलचे मार्गदर्शन करण्यासाठी व माहिती देण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांसह नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन इन्स्टिट्यूट, पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती रिस्पॉन्स फोर्स व गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन मंडळातर्फे मॉक ड्रील प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली.
या प्रात्यक्षिक कार्यक्रमात वरील तीन संस्था तसेच केंद्रीय गृह मंत्रालय, दक्षिण व उत्तर गोवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समित्या, आरोग्य सेवा संचालनालय तसेच गोवा पोलिस व अग्निशमन संचालनालयातील 25 जवानांनी प्रात्यक्षिके करून दाखविली.
संस्थेचे प्रमुख एन.एन. रे यांनी इन्सिडंट कमांडरची, संजय कुमार (सीजीएम-एफएस) यांनी इन्सिडंट कंट्रोलरची भूमिका यावेळी बजावली. आग लागली ती विझविण्यासंदर्भात प्रात्यक्षिकेही यावेळी करून दाखविण्यात आली. अग्निशमन दलाचे व्यवस्थापक आलोक कुमार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. गोव्याच्या आपत्ती व्यवस्थापन मंडळातर्फे गौवहर जिलानी (सीनियर कन्सल्टंट), नझिया बी (पर्यवेक्षक), विकी पडवलकर (डीईओ) यांनी सर्व सहकार्य केले.
आपत्तीच्या काळात एकमेकांशी समन्वय, दळणवळण महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. आपत्तीच्या काळात काय करावे, काय करू नये, हे जाणून घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे एनआयडीएमच्या जीएमआरचे प्रमुख प्रा. सूर्या प्रकाश यांनी सांगितले. याप्रसंगी गोवहार जिलानी यांनीही मार्गदर्शन केले.
एकदिवसीय कार्यशाळा
भूकंपासारख्या आपत्तीच्या वेळी तयारी कशी करावी, तयारीत त्रुटी असतील, तर त्या भरून कशा काढाव्यात, यासारखी महत्त्वाची माहिती यावेळी देण्यात आली. आपत्ती काळातील धोका कमी कसा करता येतो किंवा कसा टाळता येतो, यासंदर्भातील पंतप्रधानांच्या दहा सूत्री कार्यक्रमाची माहिती जाणून घेण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.