Curchorem Food Court Dainik Gomantak
गोवा

Curchorem Food Court : कुडचडेतील फूड कोर्टसाठी ‘इ निविदा’; पालिकेच्या बैठकीत निर्णय

३३ फूडकोर्ट, सुडा मार्केटात ५६ फ्लॅटफॉर्मसाठी प्रक्रिया सुरू

दैनिक गोमन्तक

Curchorem Food Court : कुडचडे-काकोडा पालिकेच्या आज झालेल्या विशेष बैठकीत ३३ फूड कोर्ट व जी सुडा मार्केटमधील ५६ प्लॅटफॉर्म साठी ‘इ-निविदा’ काढण्यात येणार असून फूड कोर्टसाठी प्रत्येकी दहा हजार महिना तर प्लॅटफॉर्मसाठी दीड हजार महिना दर आकारणीसाठी मंडळाने ठराव घेतला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात उद्‍घाटन करण्यात आलेल्या फूड कोर्टमध्ये गाडेधारकांना कधी सामावून घेणार याची वाट पहात आहेत. या फूड कोर्ट समोर दहा रस ऑम्लेट व पाणीपुरी गाडेधारक असून चार दीनदयाळ योजनेचे गाडे आहेत. सदर फूड कोर्टचे उद्‍घाटन झाल्याने सदर गाडेधारक नवीनच उभारण्यात आलेल्या फूड कोर्टमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत.

फूड कोर्टचे उद्‍घाटन झाल्यानंतर पर्यटन खात्याने सदर फूड कोर्टचा ताबा कुडचडे पालिकेकडे दिला असल्याने आता त्यांचे भाडे दर दिवशी की दर महिना आकारावे या विषयावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी बहुतेक नगरसेवकांनी दर महिना भाडे आकारणीवर शिक्कामोर्तब केले.

यावेळी सदर फूड कोर्ट व जी सुडा मार्केटमधील प्लॅटफॉर्मचे दर महिना भाडे व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फूड कोर्टसाठी कमीत कमी महिना दहा हजार तर प्लॅटफॉर्मसाठी दीड हजार भाडे आकारण्यात यावे. हे काम पालिकेला परवडणार नसल्याने ते खाजगी कंत्राटदाराला द्यावे, व यासाठी ‘इ-निविदा’ काढणार असल्याचे नगराध्यक्ष जसमीन ब्रागांझा यांनी सांगितले.

कुडचडे बाजारात व्यवसाय कसा होतो, हे एकाही नगरसेवकाला माहिती नसल्याने सदर भाडे आकारणीविषयी काही व्यावसायिकांचा सल्ला घेतला असता तर चांगले झाले असते, असे बाळकृष्ण होडरकर यांनी सांगितले. सध्या जो दर ठरवण्यात आले आहेत, ते पालिका मंडळाच्या मान्यतेने ठेवले असून फूड कोर्टसाठी सर्व खर्च मिळून कमीत कमी साडे बारा हजारपर्यंत भाडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दीनदयाळ गाड्यांना प्राधान्य

या परिसरात सध्या जे दहा ऑम्लेट व पाणीपुरी गाडेधारक व चार दीनदयाळ गाडे आहेत, त्यांना फूड कोर्टमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्याधिकारी मनोहर कारेकर यांनी सांगितले. कारण या पूर्वी हे गाडे या ठिकाणी कार्यरत होेते. त्यांच्यासाठी ही खास तरतूद करण्यात आली असल्याचे समजते.महिनाकाठी जे भाडे आकारण्यात येणार आहे, त्यात या गाडेधारकासाठी किती सूट द्यावी, याविषयी आज काहीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

गोमन्तकमध्ये सोमवारी (ता. 13) प्रसिद्ध झालेले वृत्त.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बाईक फुल स्पीडमध्ये, दोन्ही हात सोडले...तरुणीचा जीवघेणा स्टंट व्हायरल! पोलीस घेतायत शोध

Goa Crime: सांकवाळ येथे फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT