Mopa Airport Goa Dainik Gomantak
गोवा

E-Cigarette at Goa Airport: अंतर्वस्त्रात ई-सिगारेट लपवून नेणाऱ्या दोन महिलांना मोपा विमानतळावर अटक; गुन्ह्याची नोंद

Mopa Airport: भारतात प्रतिबंधित असलेली ई-सिगारेट घेऊन प्लाइटमध्ये चढण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना मोपा विमानतळ पोलिसांनी पकडले.

Manish Jadhav

भारतात प्रतिबंधित असलेली ई-सिगारेट घेऊन प्लाइटमध्ये चढण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना मोपा विमानतळ पोलिसांनी पकडले. या दोघींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोन महिलांपैकी एक भारतीय असून दुसरी परदेशी आहे. दोघींनी आपल्या अंतर्वस्त्रात ई-सिगारेट लपवून ठेवल्या होत्या. रुत्वी पंडित (गुजरात) जी राजकोटला जात होती तर जेन केर्नी (यूके आणि उत्तर आयर्लंडची नागरिक) ती लंडनला जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, 27 नोव्हेंबर रोजी वैध कागदपत्रांशिवाय ई-सिगारेट बाळगल्याप्रकरणी मोपा विमानतळ पोलिसांनी एका रशियन नागरिकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. भारतात (India) सप्टेंबर 2019 असून ई-सिगारेटच्या वापरावर बंदी आहे आणि तरीही अवैध प्रकारे ही सिगरेट आढळून आल्याने रशियन नागरिक पोलिसांच्या हाती लागला.

उत्तर गोव्यातील (North Goa) मोपा विमानतळावरील सीएसएफ युनिटचे एसआय राजेश मांझी यांनी ही तक्रार दाखल केली होती. विमानतळावर तपासणीदरम्यान इरोशकिन अलेक्सेईला ई-सिगारेट आढळून आली होती. रशियातील नागरिकाने त्याच्या उजव्या पायाच्या सॉक्समध्ये ही ई-सिगारेट लपवलेली होती. हा प्रवासी पोलिसांच्या हाती लागताच भारतात ई-सिगारेटवर बंदी असल्याने प्रवाशाकडून शुल्क आकारले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT