Smart City Panjim: पुढील पंधरा दिवसांत आणखी बसेस आणल्या जातील
E-Bus Service In Panjim Dainik Gomantak
गोवा

E-Bus Service In Panjim: सहा इलेक्ट्रिक बसगाड्यांचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

कदंब महामंडळाच्या सहा इलेक्ट्रिक बसगाड्यांचे आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हिरवा बावटा दाखवून उद्‍घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या या बसगाड्या पणजी, दोनापावला, ताळगाव या मार्गावर धावणार आहेत.

‘स्मार्ट सिटी’अंतर्गत शहरात ४८ इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुढील पंधरा दिवसांत आणखी बसेस आणल्या जातील.

पणजी (Panjim) कदंब बसस्थानकावर आयोजित उद्‌घाटन कार्यक्रमास वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे, कदंब महामंडळाचे अध्‍यक्ष आमदार उल्हास तुयेकर, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्‍यासह मान्‍यवरांची उपस्‍थिती होती.

दरम्‍यान, उद्‍घाटनानंतर उपस्थित मंत्री, आमदारांनी इलेक्ट्रिक बसगाडीतून पणजीत फेरफटका मारला.

मुख्यमंत्र्यांसह अन्‍य नेत्‍यांचा बस प्रवास

कदंबच्या स्मार्ट ईव्ही बससेवेचा शुभारंभ झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, कदंब महामंडळाचे अध्‍यक्ष आमदार उल्‍हास तुयेकर, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस व महामंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयापर्यंत बसने प्रवास केला. सावंत व गुदिन्हो एका सीटवर, तर तुयेकर-रुडॉल्फ हे मागील सीटवर एकत्र बसले होते.

या मार्गावर धावतील बसेस

कदंब महामंडळाकडे आणखी शंभर ईव्ही बसेस येणे बाकी आहेत. त्‍यातील ४८ बसेसचा वापर राजधानी पणजी शहरासाठी होणार आहे. सध्या सहा बसेस सुरू झाल्या आहेत. या बसेस बसस्थानक ते मिरामार-दोनापावला-गोवा विद्यापीठ-गोमेकॉ- सांताक्रुझमार्गे बसस्थानक, तर बसस्थानक-सांताक्रुझ-गोमेकॉ-गोवा विद्यापीठ-दोनापावला-मिरामार-बसस्थानक असा प्रवास करणार आहेत. आणखी येणाऱ्या सहा बसेसचा वापर अंतर्गत मार्गावर केला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT