Loksabha Election 2024: इंडिया आघाडीच्या रॅलीवेळी राष्ट्रीय टीव्ही चॅनलचा एक प्रतिनिधी आणि उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्यात वाद झाला. नंतर मालभाट येथे आमदार दिगंबर कामत यांच्या घरासमोर हुल्लडबाजी झाली. कार्यकर्त्यांनी मोठमोठ्याने घोषणा दिल्याने काही काळ गोंधळ उडाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती हाताळली.
इंडिया आघाडीचे कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप, शिवसेना, तृणमूल कॉंग्रेस या घटक पक्षांनी आज मडगावात दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या प्रचारार्थ मडगाव मार्केट ते पांडवा कपेलपर्यंत मिरवणूक आयोजित केली होती. आके येथे रॅलीचे सभेत रूपांतर झाले. न्यू मार्केटमधील बॅंक ऑफ इंडियाकडून ही मिरवणूक मालभाट व विशांत मार्गे पांडवा कपेलकडे गेली. या रॅलीत घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते होते.
मडगावचा समतोल बिघडत आहे. मडगावकरांनी यावेळी इंडिया आघाडीचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना भरघोस मतांची आघाडी देऊन क्रांती घडवावी.
कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्या व्हिडिओमध्ये भाजपने फेरफार केला आहे. राज्यघटना, गोव्याचे प्रश्र्न यासंदर्भात मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष तसेच पंतप्रधानांनी कॅ. विरियातो यांच्याशी जाहीररित्या चर्चा करावी. सध्या भाजपला पराभव स्पष्ट दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.