Durgadas Kamat  Dainik Gomantak
गोवा

Durgadas Kamat: सुनावणी रात्री अकरा वाजता! कामत पोहोचलेही पण पुढे काय झाले? तुम्हीच पाहा

कामत यांनी शेअर केलेला प्रसंग सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा फॉरवर्डचे सचिव आणि प्रवक्ता दुर्गादास कामत (Goa Forward Spokeperson Durgadas Kamat) यांनी राज्यातील भाजप सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे. कामत यांनी बुधवारी रात्री त्यांच्या सोबत घडलेला एक प्रसंग सोशल मिडियावर (Social Media) शेअर केला आहे. कामत यांनी शेअर केलेला प्रसंग सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

झाले असे की, खाण आणि भूगर्भशास्त्र संचालनालयाकडे दुर्गादास कामत यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागविली होती. याप्रकरणी त्यांनी 28 ऑक्टोंबर रोजी अर्ज दाखल केला होता. त्यावर मिळालेल्या माहितीवर दुर्गादास कामत समाधानी नव्हते. या अर्जावर 05 डिसेंबर रोजी पहिली सुनावणी होणार होती. त्यानंतर यावर पुन्हा सुनावणी करिता 28 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता ही वेळी कामत यांना कळविण्यात आली. कामत यांना या सुनावणीसाठी संबधित अधिकारी आणि पॅनल समोर हजर राहण्याची विनंती करण्यात आली. अशी नोटीस 22 डिसेंबर रोजी दुर्गादास कामत यांना देण्यात आली.

दरम्यान, या सुनावणीसाठी दुर्गादास कामत बुधवारी रात्री अकरा वाजता खाण आणि भूगर्भशास्त्र संचालनालय, पणजी येथे पोहोचले. पण रात्री हे खाते बंद असल्याचे त्यांना आढळले.

"मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार रात्री देखील काम करत आहे हे पाहून मला धक्काच बसला. सुनावणीसाठी खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या इमारतीजवळ पोहोचलोही मात्र, हा विभाग बंद असल्याचे दिसून आले. ही अवस्था आहे व्यवस्थापनाची!" असे ट्विट कामत यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT