Goa Petrol-Diesel Price: इंधन दर कपात कधी, चार महिन्यांपासून दर स्थिर; गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे दर काय?

महागाईने त्रस्त झालेले सामान्य नागरिक इंधनाच्या दरात कपात कधी होणार असा सवाल उपस्थित करत आहेत.
Petrol Diesel Prices in Goa | Fuel Oil Petrol Diesel Price | Fuel Prices in Goa
Petrol Diesel Prices in Goa | Fuel Oil Petrol Diesel Price | Fuel Prices in GoaDaink Gomantak

Goa Petrol-Diesel Price: केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली होती. गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत. महागाईने त्रस्त झालेले सामान्य नागरिक इंधनाच्या दरात कपात कधी होणार असा सवाल उपस्थित करत आहेत. नव्या वर्षात इंधनाच्या कपास होण्याची शक्यता वर्तवली जात असून, 2023 मध्ये ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. दरम्यान, आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.

Petrol Diesel Prices in Goa | Fuel Oil Petrol Diesel Price | Fuel Prices in Goa
Layoffs Data 2022: 'या' वर्षी 52 कंपन्यांमध्ये 18,000 कर्मचार्‍यांच्या गेल्या नोकऱ्या, जाणून घ्या सविस्तर

गोव्यातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.84

  • Panjim ₹ 97.84

  • South Goa ₹ 97.75

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.39

  • Panjim ₹ 90.39

  • South Goa ₹ 90.29

Petrol Diesel Prices in Goa | Fuel Oil Petrol Diesel Price | Fuel Prices in Goa
CM Pramod Sawant: नवीन झुआरी पुलावर खासगी गाडीतून मुख्यमंत्र्यांचा फेरफटका

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com