River Issue
River Issue Dainik Gomantak
गोवा

Goa River Issue: ‘पार’ नदीला प्रदूषणाचा विळखा

दैनिक गोमन्तक

Goa River Issue: डिचोलीतील काही गावांसह संपूर्ण बार्देश तालुक्याची जीवनदायिनी असलेली अस्नोडा येथील ‘पार’ नदीचे अस्तित्व संकटात आले आहे. कचरा टाकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने ही नदी प्रदूषणाच्या विळख्यात गटांगळ्या खात आहे. या नदीवर कोसळलेल्या संकटाची दखल घेत स्थानिक अस्नोडा पंचायतही आता सतर्क झाली आहे.

पार नदीला प्रदूषणाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी गांभीर्याने पावले उचलण्यात येणार असल्याचे पंचायतीने स्पष्ट केले आहे. तसेच कचरा टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पंचायतीने स्पष्ट केले आहे.

डिचोलीतील मुळगाव आणि शिरगावहून पुढे बार्देश तालुक्याला जोडलेली ‘पार’ नदी डिचोलीसह बार्देश तालुक्यासाठी वरदान ठरली आहे. मात्र याच नदीवर सध्या मानवनिर्मित प्रदूषणाचा आघात झाला आहे. कचऱ्यासह नदीत सांडपाणी मिसळत असतानाच विविध ठिकाणी कपडे आणि गुरांना धुण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे या नदीत काही अस्वच्छता निर्माण होत असून पाणी प्रदूषित झालेले आहे. तसेच तेथील परिसराला ओंगळवाणे स्‍वरूप प्राप्‍त झाले आहे.

सदर नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत, तर काही वर्षांनंतर नदीचे अस्तित्व पूर्ण धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्‍यात येत आहे. एकेकाळी म्हणजेच साधारण पंधरा वर्षांपूर्वी किरकोळ अपवाद वगळता ही नदी स्वच्छ दिसून येत होती. मात्र हळूहळू नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकत गेली. दिवसेंदिवस नदीत अस्वच्छतेचे प्रमाण वाढत आहे.

गलिच्छ, दुर्गंधीयुक्त परिसर

‘पार’ नदीत प्लास्टिकसह निर्माल्य टाकण्याचे प्रकार चालूच असतात. शिवाय काहीजण घरातील किंवा हॉटेलमधील कचरा आणि टाकाऊ पदार्थ नदीत टाकत असल्याची माहिती मिळाली आहे. चिंतेची बाब म्हणजे बाजारातील काही चिकनविक्रेते बॉयलर कोंबड्यांचे अवशेष नदीत टाकत असल्‍याचे आढळून आले आहे. मासेविक्रेते टाकाऊ, खराब मासळीही नदीत फेकतात. त्यामुळे अस्नोडा पुलाजवळ नदीचा परिसर गलिच्छ आणि दुर्गंधीयुक्त बनला आहे.

दंडात्मक कारवाईचा इशारा

पार ननदीत कचरा टाकण्याचे प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे सरपंच फ्रान्‍सिस वाझ यांनी सांगितले. कचरा टाकताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट करून पाच हजारांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार असल्याचा इशारा दिला. ‘पार’ नदीतील वाढत्या कचरा प्रदूषणाबद्धल उपसरपंच सपना मापारी यांनीही खंत व्यक्त केली. नदीचे अस्तित्व टिकवण्‍यासाठी दंडात्मक कारवाईसह जनजागृती करणार असल्याचे त्‍यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT