Goa Rain  Dainik Gomantak
गोवा

पावसाचे पाणी वाढल्याने काकोडा येथील धनगर वाड्यावरील साकवाची वाताहत

काल रात्री पासून पडत असलेल्या पावसामुळे काकोडा येथे धनगर वाड्यावर जाणाऱ्या रस्त्यावरील साकवावरून पाणी वाहू लागल्याने धनगर वाड्यावरील लोकांना आपल्या कामावर जाण्यासाठी पाणी ओसरण्याची वाट पहावी लागली.

दैनिक गोमन्तक

कुडचडे : काल रात्री पासून पडत असलेल्या पावसामुळे काकोडा येथे धनगर वाड्यावर जाणाऱ्या रस्त्यावरील साकवावरून पाणी वाहू लागल्याने धनगर वाड्यावरील लोकांना आपल्या कामावर जाण्यासाठी पाणी ओसरण्याची वाट पहावी लागली. या वाड्यावर जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने गावातील बरेच बरेच लोक खोळंबून पडले होते.

काकोडा कुडचडे पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पावर जाण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग होत असल्याने कचऱ्याची काही वाहने अडकून पडली होती सदर साकव मोठी पाईपे घालून तयार करण्यात आला असून पाण्याच्या झोताने साकवाची बरीच हानी झाली आहे.

दरम्यान,काही ठिकाणी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेल्डे व अवेडे येथे घरावर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून यात कुणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे कुडचडे अग्निशामक दलाने सांगितले. शेल्डे येथे घरावर झाड पडल्याने सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आज दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी पावसामुळे पडझड झाल्याने अग्निशामक जवानांना स्थिती आटोक्यात आणण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषकात जर्मनीचा नवा इतिहास; कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवत ब्राझीलचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT