Coronavirus Mask Dainik Gomantak
गोवा

Coronavirus : धास्तीमुळे ‘मास्क’ खरेदीत वाढ; ‘एसओपी’चे पालन

ज्येष्ठ नागरिकांसह शालेय मुलांकडून वापर वाढला

दैनिक गोमन्तक डिजिटल

कोरोनाचे संकट कमी झाल्याने नागरिकांत मास्क वापरणे बंद झाले होते. मात्र, राज्यात वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे ‘एसओपी’चे पालन करण्याकडे जनतेचा कल दिसत आहे. शाळांतून मास्कचा वापर वाढला आहे.

गुरूवारी एका रुग्णाच्या बळी गेल्याने तसेच एकाच दिवशी उच्चांकी 108 कोरोनाबाधित रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील नागरिक काही प्रमाणात सतर्क झाले असून राज्यात मास्क वापरणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

संसर्गाची धास्ती पुन्हा वाढल्याने मास्क खरेदी तसेच वापरण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक, शालेय मुले तसेच प्रवासात मास्कचा वापर करीत आहेत. बाजारपेठेतील दुकानांत औषधालये तसेच इतर अनेक ठिकाणी मास्क पुन्हा दिसू लागले आहेत.

गेल्या वर्ष भरात अनेकांनी मास्क खरेदी मंदावल्याने विक्रेत्यानी नवीन मास्कची ऑर्डर दिली नव्हती. परंतु आता धिम्यागतीने का होईना, पण नागरिक पुन्हा मास्कचा वापर करू लागले आहेत.

कोरोना भीती कायम

2021 साली राज्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले होते.त्यानंतर लॉकडाउन काळात तसेच कोरोनाचे संकट कमी झाले तरी मास्क वापरणे सक्तीचे होते. मात्र, गेल्या सुमारे वर्ष-दीडवर्षांपासून मास्कचा वापर जवळजवळ बंद झाला होता.

सरकारी कार्यालयासह सार्वजनिक ठिकाणीही मास्क वापरण्यास अधिकारी वर्गासह नागरिकही टाळत होते. मात्र, राज्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त झाल्याने अनेक नागरिक मास्कचा वापर पुन्हा करू लागले आहेत.

ज्येष्ठ नागरिक सतर्क

राज्यातील अनेक नागरिक जरी मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करत असली तरी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, अनेक शासकीय तसेच खाजगी कार्यालयांमध्ये सेवा बजावत असणारे कर्मचारी, मास्कचा वापर करताना दिसतात आहेत.

परंतु प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडताना प्रामुख्याने मास्कचा वापर करत आहेत त्यामुळे ज्येष्ठ नागरिक मास्कसंबंधी अधिक सतर्क असल्याचे दिसून येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: प्रकृती इतकी गंभीर होती तर विदेशात पळून का गेलात? लुथरांविरोधात सरकारी वकिलांचा युक्तिवाद

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलिस कोठडी, विशेष निवास व्यवस्था; झोपण्यासाठी मागितलेल्या गादीची मागणी फेटाळली

Horoscope:भाग्याचा तारा चमकणार! 'या' राशींना मिळणार सुखाची बातमी, वाचा तुमचे भविष्य!

Goa Crime: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! वाळपईत महिलेचं अपहरण करुन नराधमानं केलं निंदनीय कृत्य

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

SCROLL FOR NEXT