Goa Road Condition Dainik Gomantak
गोवा

Panjim Road Condition: राज्यातील रस्ते खड्डेमय, धुळीमुळे नागरिक त्रास्त

Panjim Road Condition: पणजी शहरातील सांतिनेज ते तांबडीमातीपर्यंतच्या रस्त्याच्या बाजूच्या गटाराचे काम सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

Panjim Road Condition: पणजी शहरातील सांतिनेज ते तांबडीमातीपर्यंतच्या रस्त्याच्या बाजूच्या गटाराचे काम सुरू आहे. खोदलेल्या गटाराची माती बाजूलाच टाकली असल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे ती रस्त्यावर पसरली जात आहे. त्याशिवाय काही ठिकाणी दगडमातीने भरलेले खड्डे पुन्हा होत्या त्या स्थितीत आले आहेत.

त्यामुळे मोठ्या वाहनांमुळे या मार्गावर धूळ उडत असून त्याचा दुचाकीस्वारांना त्रास होत आहे. सांतिनेजमध्ये मागील काही महिन्यांत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी व चेंबर बांधण्यासाठी काम सुरू असताना दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागला होता. आता सांतिनेजमधील विवांता हॉटेलच्या चौकापासून ते आरबीआय अधिकाऱ्यांच्या बंगल्यापर्यंत गटाराचे काम सुरू आहे. त्यानंतर पुढे ‘वाय’ चौकातून सरकारी वसाहतीपासून स्मशानभूमीपर्यंत गटाराचे काम सुरू आहे.

जेसीबीच्या साह्याने रस्त्याच्या एका बाजूला खोदकाम करण्यात आले असून माती रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आली आहे. सांतिनेजमधील काही सोसायटीतील नागरिकांना नगरसेवकांकडे तक्रार केली आहे. नगरसेवकांनी तक्रारी ऐकून घेतल्या असल्या तरी गटाराचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT