Bicholim Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Bicholim Traffic Jam: डिचोलीत बेशिस्त वाहतुकीचा 'कळस'; नव्या पुलाला जोडणारा जंक्शन बनला धोकादायक

Bicholim Traffic Jam: शहरात बेशिस्तपणे वाहतुकीचे प्रकार वाढत असून, शहरातील ‘सेतू संगम’जवळील जंक्शनवर वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत असल्याचे आढळून येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Traffic Jam: शहरात बेशिस्तपणे वाहतुकीचे प्रकार वाढत असून, शहरातील ‘सेतू संगम’जवळील जंक्शनवर वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत असल्याचे आढळून येत आहे. जुन्या आणि नवीन पुलाला जोडणारे जंक्शन तर दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. या जंक्शनवर बेशिस्त वाहतुकीचे प्रकार वाढत असून, नियमांचे उल्लंघन करुन वाहतूक करण्यात येत आहे. मुस्लिमवाड्यावरून शहराच्या दिशेने जाणारी काही वाहने तर चक्क ‘नो एन्ट्री’ असतानाही नवीन पुलावरून वाहतूक करीत असल्याचे आढळून येत आहे. यामुळे या जंक्शनवर अपघातांचा धोका वाढत आहे. वाहतूक विभागाने वेळीच या प्रकाराची दखल घेत आवश्यक उपाययोजना करावी. अशी मागणी होत आहे.

दरम्यान, शहरातील जुन्या पुलाला समांतर नवीन पूल बांधल्यापासून दोन्ही पुलावरून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार साखळीमार्गे मुस्लिमवाड्यावरून येणाऱ्या वाहनांना डिचोली शहरात प्रवेश करण्यासाठी जुन्या पुलावरून, तर डिचोली शहरातून मुस्लिमवाड्याच्या दिशेने पुढे जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन पुलावरून वाहतूक करणे बंधनकारक आहे. मात्र डिचोली शहराच्या दिशेने जाणारी काही वाहने हा नियम पाळीत नसल्याचे आढळून येत आहे.

‘नो एन्ट्री’ क्षेत्रातून एखादे वाहन करतेवेळी नवीन पुलावरून समोरून येणाऱ्या वाहनचालकांचा गोंधळ उडत असतो. बऱ्याचदा वाहनचालकांमध्ये वादही निर्माण होत असतात. पोलिसांच्या कारवाईमुळे मध्यंतरी या प्रकारावर नियंत्रण आले होते. आता पुन्हा हे प्रकार वाढले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

रात्रीच्या वेळी वाहने ‘नो एन्ट्री’त

रात्रीच्यावेळी तर साखळी मार्गाने येणारी बहूतेक वाहने ‘प्रवेश बंदी’ असतानाही नवीन पुलावरून वाहतूक करताना आढळून येतात. नियमांचे उल्लंघन करुन वाहतूक करणारी बहुतांश वाहने ही चोर्ला घाटाच्या मार्गे येणारी असतात. अवजड वाहने तर हटकून ‘नो एन्ट्री’च्या मार्गानेच वाहतूक करतात, अशी माहिती मिळाली आहे. संबंधित खात्याने या बेदरकार वाहनचालकांवर वेळीच कारवाई करावी, अन्यथा हे प्रकार रोखावेत, अशी मागणी नियमांचे पालन करणाऱ्या डिचोली,साखळी आणि परिसरातील वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job: पोलिस भाजपचे प्रवक्‍ते आहेत का? युरी, सरदेसाईंचा संताप; उच्‍चस्‍तरीय चौकशीवर बाबूशही ठाम

IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Goa Government Jobs: 'निवड आयोगा'तर्फे विविध खात्‍यांतील रिक्‍त पदांची भरती! 24 तासांत लागणार निकाल

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

SCROLL FOR NEXT