Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: जी-20’ मुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गोवा संमेलन स्थळ म्हणून गाजेल- सदानंद शेट तानावडे

प्रदेश कार्यकारिणीत पंतप्रधानांचे अभिनंदन

गोमन्तक डिजिटल टीम

एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीत होणाऱ्या ‘जी-20’ गटांच्या आठ महत्त्वाच्या बैठकांचे यजमानपद गोव्याला लाभले आहे, ही अभिमानाची बाब आहे. यामुळे गोव्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनस्थळ तसेच संमेलन स्थळ म्हणून प्रतिमा उंचावण्यात मदत होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या बैठकीत ‘जी-20’चे अध्यक्षपद मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

वास्कोत भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज हॉटेल एचक्यू मध्ये पार पडली. या बैठकीचे उद्‍घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. या बैठकीला केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री रोहन खवंटे, मंत्री माविन गुदिन्हो, आमदार दाजी साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मुरगाव मंडळ अध्यक्ष संजय सातार्डेकर, वास्को मंडळ अध्यक्ष दीपक नाईक, दाबोळी मंडळ अध्यक्ष संदीप, मुरगावचे प्रभारी जयंत जाधव तसेच आजी-माजी मंत्री आमदार व नेतेमंडळी उपस्थित होती.

मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली विकास !

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची पक्षाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचे कार्यकारीणी बैठकीत अभिनंदन करण्यात आले.

गोवा विधानसभा निवडणुकीसह विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष पुन्हा सत्ता प्राप्त करेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या मानव विकास आणि पायाभूत सुविधांबाबत प्रदेश कार्यकारिणी समाधान व्यक्त करत असल्याचाही ठराव घेण्यात आला,असे सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT