Fish Market Price Incresed  Dainik Gomantak
गोवा

Goa Fish Market: बाजारात आवक घटल्याने मासळी महागली!

Goa Fish Market: इसवण १०००, बांगडे ४०० किलो तर पापलेट ८०० रुपये वाटा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Fish Market: राज्यात मासेमारी बंदी सुरू झाल्याने बाजारात मासळीची आवक घटली आहे अशातच मत्सप्रेमी खवय्यांना मासळीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. राज्यात सध्या मुबलक मासळी नसल्याने तसेच आवक वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पणजी बाजारात मोठे बांगडे ४०० रुपये प्रती किलो दराने विकले जात आहेत. तर लहान बांगडे ३०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. सर्वसामान्यांना आवडणारी तार्लीचे दर ३०० रुपये प्रती किलो झाले आहेत. इसवण १ हजार रुपये किलो तर मध्यम आकाराचे पापलेट ८०० रुपये प्रती वाटा दराने विकले जात आहेत. कोळंबी (सुंगठे) ४५० रुपये किलो, लेपो आकाराप्रमाणे २५० ते ४०० रुपये किलो दराने विकले जात आहे.

आज पणजी बाजारात बांगडा, तारली, खुबे, कोळंबी, इसवण, पापलेट, लेपो, आदी विविध प्रकारचे मासे उपलब्ध होते. मंगळवार असल्याने बाजारात मासळी खरेदीसाठी सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होती, परंतु मासळीचे वाढलेले दर पाहून अनेकांना खरेदी करताना दोनदा विचार करावा लागत असे सर्वसामान्यपणे जो ग्राहक मोठ्या प्रमाणात मासळी खरेदी करत होता, तो देखील खरेदी करताना विचार करत होता.

अस्वच्छतेचे साम्राज्य

पणजीतील मासळी बाजारात प्रवेश करतानाच मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दृष्टीस पडते गोव्याच्या राजधानीचे खासकरून स्मार्ट सिटीच्या मासळी बाजाराची ही अवस्था असल्याने आश्‍चर्य वाटते. या अस्वच्छतेवर महानगरपालिकेने काही उपाय योजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT