Dudhsagar Waterfall Dainik Gomantak
गोवा

Viral Video: दुधसागर धबधब्याचा नयनरम्य व्हिडिओ व्हायरल, निसर्गाची किमया पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Dudhsagar Waterfall Viral Video: गोव्यातील प्रसिद्ध दुधसागर धबधब्याचा एक नयनरम्य व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Dudhsagar Waterfall Viral Video: गोव्यातील प्रसिद्ध दुधसागर धबधब्याचा एक नयनरम्य व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने वाहणारा हा धबधबा आणि रेल्वे यामुळे तयार झालेले दृश्य अविश्वसनीय असून ते पाहण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हिडिओमध्ये काय आहे?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, गोवा (Goa) आणि कर्नाटक सीमेवरील दुधसागर धबधब्यावरुन निसर्गाची विहंगमता पाहायला मिळत आहे. या मनमोहक दृश्यात आणखी भर घालत आहे ती म्हणजे इथून जाणारी रेल्वे. एका पुलावरुन एक रेल्वे धबधब्याच्या समोरुन जाताना दिसत आहे. हा नजारा डोळ्यांना सुखावणारा असून निसर्गाची भव्यता आणि मानवनिर्मित अभियांत्रिकीचा संगम यात स्पष्ट दिसतो. अनेकदा तर रेल्वे धबधब्याच्या पाण्याच्या तुषारांनी अक्षरशः न्हाऊन निघते, जे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.

हा व्हिडिओ सोशल मीडिया (Social Midea) प्लॅटफॉर्मवर इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत हजारोहूंन अधिक व्ह्यूज मिळाले असून हजारो लोकांनी त्याला लाईक केले आहे. नेटकरी या व्हिडिओवर इमोजीच्या माध्यमातून कमेंटही करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

SCROLL FOR NEXT