MLA Dr. Deviya Rane Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Waterfall: दूधसागर पर्यटन हंगाम सुरु करण्यास परवानगी; GTDC- टूर ऑपरेटर्स वादावर CM सावंतांकडून तोडगा

MLA Dr. Deviya Rane: राज्यात पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. देश-विदेशातील पर्यटक गोव्याला येऊ लागले आहेत. गोव्यातील दूधसागर धबधबा हा पर्यटकाचं नेहमीच आकर्षण राहिला आहे.

Manish Jadhav

राज्यात पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. देश-विदेशातील पर्यटक गोव्याला येऊ लागले आहेत. गोव्यातील दूधसागर धबधबा हा पर्यटकाचं नेहमीच आकर्षण राहिला आहे. पर्यटक दरवर्षी मोठ्याप्रमाणावर दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येतात. दुसरीकडे मात्र गेल्या काही दिवसांपासून दूधसागरवरील जीटीडीसीच्या ऑनलाईन काउंटवरवरुन वाद उफळला आहे.

सरकारने यावर तोडगा काढावा अशी मागणी काही दिवसांपूर्वी निलेश वेळीप यांच्याकडून करण्यात आली होती. यावरच आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून दोन दिवसांपूर्वी जीटीडीसी आणि टूर ऑपरेटर्स यांच्यातील समस्यांचे निवारण करण्यात आल्याचे आमदार देविया राणे यांनी सांगितले. याशिवाय, वन विभागाकडून दूधसागर पर्यटन हंगाम सुरु करण्यास परवानगी दिल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.

पाऊसकरांचा जाहीर पाठिंबा

दरम्यान, जीटीडीसी’चा ऑनलाईन काउंटर जोपर्यंत बंद केला जात नाही आणि आमची वेबसाईट आम्हाला परत दिली जात नाही, तोपर्यंत दूधसागर पर्यटन हंगाम चालू करण्यास आमचा ठाम विरोध असेल, असा इशारा काही दिवसांपूर्वी दूधसागर जीप टूर असोसिएशनने सरकारला दिला होता.

त्यानंतर विरोधकांनीही सरकारला (Government) या मुद्यावरुन घेरण्याचा प्रयत्न केला होता. दूधसागरवरील जीटीडीसीची वेबसाईट बंद करण्याच्या जीप असोसिएशनच्या मागणीला सावर्डेचे माजी आमदार आणि मंत्री दिपक पाऊसकरांनी (22 ऑक्टोबर) पाठिंबा जाहीर केला. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना भेटून चर्चा केल्यानंतर पाऊसकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.

नेमकी मागणी काय?

दूधसागर धबधबा (Dudhsagar Waterfall) पर्यटन व्यवसायाची वेबसाईट आहे, ती आमची वेबसाईट आम्हांला परत द्यावी. या ठिकाणी जीटीडीसीचा हस्तक्षेप नको. सरकारला जो काही कर आहे, तो आम्ही भरण्यास तयार आहे, असे जीप टूर ऑपरेटर्संनी सांगितले आहे. आम्हांला जिटीडीसीचा हस्तक्षेप नको, आम्हांला आपण सहकार्य करावे, अशी मागणी अध्यक्ष निलेश वेळीप आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Department of Animal Husbandry: पशुसंवर्धन खाते प्रमुखांविना ठप्प, कामधेनू सुधारित योजनेसह अनेक योजना प्रभावित

Goa Today's News Live: बांबोळीत पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकली बस

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन'! गुरुवारी 'या' 3 राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, परिश्रमाचे उत्तम फळ मिळणार

Night Vigil App: तंत्रज्ञानामुळे रात्रीची सुरक्षा होणार अधिक सक्षम, विद्यार्थ्यांनी बनवलेले 'नाईट व्हिजिल' ॲप पोलिसांसाठी नवे हत्‍यार

Jasprit Bumrah Record: 'शतक' नाही, 'त्रिशतक'! जसप्रीत बुमराह बनणार क्रिकेटचा 'ऑल-फॉरमॅट किंग', फक्त 2 विकेट्सची गरज

SCROLL FOR NEXT