Dudhsagar Jeep Tour Association Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Tourism: 'दूधसागर' हंगाम चालू होणार की नाही? ‘जीटीडीसी’ काउंटर, वेबसाईटवरुन असोसिएशन आक्रमक

Dudhsagar Jeep Tour Association: ‘जीटीडीसी’चा ऑनलाईन काउंटर जोपर्यंत बंद केला जात नाही व आमची वेबसाईट आम्हाला परत दिली जात नाही, तोपर्यंत दूधसागर पर्यटन हंगाम चालू करण्यास आमचा ठाम विरोध असेल, असा इशारा दूधसागर जीप टूर असोसिएशनने सरकारला दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Local Tourism Operators Issue Ultimatum Over Dudhsagar Tourism

कुळे: ‘जीटीडीसी’चा ऑनलाईन काउंटर जोपर्यंत बंद केला जात नाही व आमची वेबसाईट आम्हाला परत दिली जात नाही, तोपर्यंत दूधसागर पर्यटन हंगाम चालू करण्यास आमचा ठाम विरोध असेल, असा इशारा दूधसागर जीप टूर असोसिएशनने सरकारला दिला आहे. आज कुळे येथे संघटनेच्या झालेल्या बैठकीत सर्वांनी हात उंचावून हा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ‘जीटीडीसी’ काउंटर एक महिना चालू ठेवून पर्यटन हंगाम कसा चालतो, तो पाहुया आणि मग पुढे काय करावे ते आपण पाहतो, असे सांगितले होते.

त्यानुसार दूधसागर टूर जीप असोसिएशनने आज सर्व जीपमालकांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांचा निर्णय त्यांच्यासमोर ठेवला. यावेळी यावर बरीच चर्चा झाली व शेवटी जोपर्यंत या ठिकाणी असलेला ‘जीटीडीसी’ ऑनलाईन काउंटर बंद केला जात नाही व आमची वेबसाईट आम्हाला परत करत नाही, तो पर्यंत पर्यटन हंगाम चालू करण्यास आमचा विरोध असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावा!

कुळे दूधसागर पर्यटन हंगाम २ ऑक्टोबर रोजी चालू होत होता, त्यामुळे कुळेतील बाजार व यावर अवलंबून असलेल्या सर्वांची दुकाने तसेच इतर व्यवसाय यापूर्वी तेजीत चालायचे पण यंदाचा पर्यटन हंगाम अजून सुरू न झाल्याने कुळे बाजार तसेच त्यावर अवलंबून असलेल्यांना आर्थिक फटका बसत आहे. तेव्हा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी याची दखल घेऊन सर्वांना उपयुक्त ठरेल असा योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

हंगाम सुरू होण्याबाबत संभ्रम

कुळे येथील दूधसागर पर्यटन हंगाम २१ ऑक्टोबर रोजी चालू करण्याची तयारी सरकारने केली होती, या संदर्भात गोवा वन विकास महामंडळाच्या चेअरमन दिव्या राणे यांनी प्रसार माध्यमातून जाहीरही केले होते, पण जीप टूर असोसिएशन यांनी घेतलेल्या निर्णयावरून यंदा पर्यटन हंगाम चालू होणार की नाही, हे सांगणे मुश्किल झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT