Goa Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Fire : सत्तरीत सुक्या गवताला आग; हजारोंचं नुकसान

सत्तरीमधील केरीमध्ये आजोबा मंदिराजवळ सुक्या गवताला आग लागली.

आदित्य जोशी

गोव्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमालीची वाढ झाली आहे. सत्तरीमध्ये सुक्या गवताला आग लागून हजारो रुपयांचं नुकसान झालं आहे. आज शुक्रवारी सकाळीच ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल होत पथकाने आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

सत्तरीमधील केरीमध्ये आजोबा मंदिराजवळ सुक्या गवताला आग लागली. दुपारची वेळ असल्याने ही आग वाढतच गेली. अखेर स्थानिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे सत्तरी तालुक्यातच कोपार्डे येथे काकोडकर फार्मजवळ काजूमध्ये आग लागली. या दोन्ही आगीच्या घटनांमध्ये हजारो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नागवाडो बेतालभाटी येथे काल रात्री एका घराला आग लागून 10 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. मोहित गोडबोले यांच्या मालकीचे हे घर असून रात्री या घरातून अचानक धूर येत असल्याचे पाहिल्यावर शेजारच्या लोकांनी जवळ येऊन पाहिले तर घराने पेट घेतला होता.

या आगीत सुमारे 10 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती घरमालकाने दिली. ही आग नेमकी कशी लागली त्याची माहिती मिळू शकली नाही. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले मात्र आगीचा बंब पोहोचण्यापूर्वीच लोकांनी ती आटोक्यात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: ड्रग्स प्रकरणात गोव्याचा 'बाबा' आणि 'मुन्ना' चर्चेत; हैदराबादेत अटक केलेल्या तस्कराच्या चौकशीत आंतरराज्य नेटवर्कचा गौप्यस्फोट

Pakistan Airstrike Afghanistan: पाकड्यांचा अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राइक! कुनार अन् पक्तिका प्रांतावर केला बॉम्बवर्षाव; अनेक जण गंभीर जखमी

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

SCROLL FOR NEXT