Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

मद्यधुंद अवस्थेत चार दुचाकीस्वारांना धडक; पर्यटक म्हापसा पोलिसांच्या ताब्यात

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्यामुळे कार आणि चार दुचाकीस्वारांचा अपघात घडला आहे. कारचालकाने रस्त्यात तब्बल चार दुचाकीस्वारांना धडक मारली.

दैनिक गोमन्तक

गोवा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असल्यामुळे वर्षाचे अगदी बाराही महीने गोव्यात देशी-परदेशी पर्यटकांची रेलचेल सुरू असते. दरम्यान सुट्टी, आणि पर्यटनाच्या अति उत्साहात बऱ्याचशा पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघनही होते. सध्या पावसाने हजेरी लावल्याने राज्यात मॉन्सून पर्यटनाने जोर धरला आहे.

सुट्टी घालवण्यासाठी गोव्यात दाखल झालेल्या काही पर्यटकांना अपघात केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्यामुळे कार आणि चार दुचाकीस्वारांचा अपघात घडला आहे. कारचालकाने रस्त्यात तब्बल चार दुचाकीस्वारांना धडक मारली. यामध्ये अपघातग्रस्त कारचालक आणि पर्यटक महिलेला म्हापसा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंबंधी पुढील तपास सुरू आहे.

ओशेलबाग-धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे पाचच्‍या सुमारास कारने उभ्‍या असलेल्‍या ट्रकला मागून धडक दिल्‍यामुळे झालेल्‍या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले तर दोघांना किरकोळ दुखापत झाली. जखमी झालेले सर्वजण महाराष्‍ट्रातील आहेत. जखमींना उपचारांसाठी इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT