Police action Canva
गोवा

Goa Crime: पर्यटकांची भररस्त्यावर तुंबळ हाणामारी; म्हापसा पोलिसांची कारवाई

Mapusa Police: मद्यधुंद स्थितीत धुमाकूळ; सहा जणांना अटक

गोमन्तक डिजिटल टीम

अहमदनगर (महाराष्ट्र)मधून आलेल्या एका पर्यटकांच्या गटाने गिरी-म्हापसा सर्व्हिस रस्त्यावर मद्यधुंद स्थितीत धुमाकूळ घातला. गाडीमधील म्युझिक सिस्टमचा आवाज कमी केल्याचा राग अनावर झाल्याने, चालत्या गाडीतच वाद उफाळला. नंतर गाडी महामार्गालगत थांबवून शाब्दिक चकमक झाली; त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.

म्हापसा पोलिसांनी या पर्यटकांनी दारू पिऊन सार्वजनिक स्थळी धिंगाणा घातल्याप्रकरणी सहा जणांविरोधात आयपी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली.

उपलब्ध माहितीनुसार, अहमदनगर येथील महाराष्ट्र नोंदणीकृत जीपमधून हा पंधरा जणांचा पर्यटकाचा एक गट गोव्यात आलेला होता. पणजीच्या दिशेने जीपमधून जातेवेळी, या पर्यटकांमध्ये आपापसात वाद उफाळला. गाडीमधील म्युझिक सिस्टमचा आवाज कमी केल्याने संबंधितांत बाचाबाची झाली अन् वादाचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले.

या गाडीत चालकासह आठजण होते. हा प्रकार पाहून या मार्गावरून प्रवास करणारे लोकही थबकले. हे पर्यटक मद्यधुंद होते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते. कालांतराने म्हापसा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्व पर्यटकांना पोलिसांनी जीपसह स्थानकावर आणले. यामध्ये एकाला मारहाण झाली होती.

दरम्यान, गोव्यात येणारे पर्यटक मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत वाढत आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT