मडगाव स्टेशन रोडवर काल एक मृतदेह आढळून आला. बेशुद्धावस्थेत सापडलेल्या या इसमाला ताबडतोब मडगाव येथील सरकारी इस्पितळात नेण्यात आले. मात्र तेव्हा तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
फौजदारी आचारसंहितेच्या १७४ कलमाखाली या प्रकरणाची मडगाव पोलिसांनी नोंद केलेली आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात मडगाव शहरात अज्ञात मृतदेह मिळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातील बहुतांश मृतदेह हे परप्रातीयांचे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.