Drunken Cop Assaults On Duty Police Margao Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: दारुची नशा अन् पोलिसांवरच हल्ला! मडगाव रेल्वे स्थानकावर मद्यधुंद पोलिसाचा राडा; कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाच केली मारहाण

Drunken Cop Assaults On Duty Police Margao: मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर कायदा आणि सुव्यवस्थेला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली.

Manish Jadhav

मडगाव: मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर कायदा आणि सुव्यवस्थेला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली. स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर एका मद्यधुंद पोलिसाने चक्क ड्युटीवर असलेल्या इतर पोलीस अधिकाऱ्यांवरच हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले, तर दुसरीकडे रक्षकच भक्षक बनल्याचे पाहून उपस्थित स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव (Margao) रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर परप्रांतीय स्थलांतरितांचा एक गट प्रवाशांना त्रास देत गोंधळ घालत होता. या गोंधळामुळे स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. या स्थलांतरितांच्या उपद्रवाविरुद्ध आणि गोंधळावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी रेल्वे पोलीस आणि ड्युटीवर असलेले इतर पोलीस अधिकारी तात्काळ प्लॅटफॉर्मवर दाखल झाले. पोलीस अधिकारी या गोंधळ घालणाऱ्या गटावर कारवाई करत असतानाच, तिथे उपस्थित असलेला आणि कथितरीत्या दारुच्या नशेत पूर्णपणे धुंद झालेला एक पोलीस कर्मचारी मध्ये आला. त्याने कारवाईत अडथळा आणण्यास सुरुवात केली.

त्याने कायदा हातात घेत थेट ड्युटीवर असलेल्या आपल्याच सहकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. स्वतः पोलीस दलात कार्यरत असूनही, ड्युटीवरील सहकाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ला केल्याचे पाहून घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या मद्यधुंद पोलिसाच्या वर्तणुकीमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली असून, कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनाच सुरक्षा मिळेनाशी झाल्याचे चित्र निर्माण झाले.

या संपूर्ण प्रकारानंतर मडगावमधील स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे असे बेजबाबदार आणि हिंसक वर्तन अत्यंत निंदनीय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या गंभीर घटनेची दखल घेत, मद्यधुंद अवस्थेत ड्युटीवरील अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली. रेल्वे पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT