Patto Panaji drunk tourists Dainik Gomantak
गोवा

Panjim: दारू पिऊन नग्नावस्थेत रोडवरच पडतात; पणजीत मद्यपी, भिकाऱ्यांचा सुळसुळाट; पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष

Patto Panaji drunk tourists: गोव्याची राजधानी पणजीतील पाटो परिसरात मद्यपी पर्यटक आणि भिकाऱ्यांची वाढती वर्दळ चिंतेचा विषय बनली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याची राजधानी पणजीतील पाटो परिसरात मद्यपी पर्यटक आणि भिकाऱ्यांची वाढती वर्दळ चिंतेचा विषय बनली आहे.

पर्यटनाचा चेहरा मानल्या जाणाऱ्या या भागात काही मद्यपी पर्यटकांकडून सार्वजनिक ठिकाणी अशोभनीय वर्तन केले जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटक महिलांनाही त्रास सहन करावा लागतोय. याबाबत पर्यटन आणि पोलिस खात्याकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

पाटो परिसरात अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये कार्यरत आहेत. शिवाय पणजीतील मुख्य बसस्थानक याच भागात असल्याने दिवसभर स्थानिक नागरिक, नोकरदार, विद्यार्थी तसेच देश-विदेशातील पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र गेल्या काही महिन्यांत या परिसरात मद्यपी पर्यटक आणि भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही पर्यटक मद्यप्राशन करून रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक जागांमध्ये किंवा इमारतींच्या परिसरात झोपतात. मद्यधुंद अवस्थेत अर्धनग्न किंवा नग्नावस्थेत पडून राहण्याचे प्रकारही घडत आहेत. त्‍यामुळे परिसरातील नागरिकांना मन:स्‍ताप सहन करावा लागतोय, तसेच गोव्याच्या पर्यटन प्रतिमेलाही धक्का बसत आहे.

काही भिकारी आणि मद्यपी सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यप्राशन करत असल्याचेही दिसून येतात. विशेषतः रात्रीच्या वेळी या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. परिसरात पोलिस गस्त असली तरी अशा घटनांवर प्रभावी नियंत्रण नसल्याची टीका केली जात आहे.

पर्यटकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसंस्कृत वातावरण उपलब्ध करून देणे ही पर्यटन आणि पोलिस विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे पाटो परिसरात नियमित गस्त वाढवून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच भिकाऱ्यांच्या वाढत्या वावरावरही नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

पोलिस गस्त वाढवावी

स्थानिक नागरिकांनी पाटो परिसरात रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि भिकाऱ्यांच्या प्रश्नावरही संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राजधानी पणजीच्या प्रतिमेवर विपरित परिणाम

पाटो हा पणजीतील प्रमुख प्रशासकीय आणि वाहतूक केंद्रांपैकी एक भाग मानला जातो. या भागात येणाऱ्या पर्यटकांना जर अशा प्रकारचे दृश्य पाहायला मिळाले, तर गोव्याच्या पर्यटन प्रतिमेवर त्याचा विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Update: रुसवा संपला, पाऊस बरसला; गोवेकरांना दिलासा, पुढील काही दिवसांत वाढ शक्य; हवामान खात्‍याचा अंदाज

वाहतूक नियमांचे डोळ्यांसमोर उल्लंघन, रक्षक सुस्तच; राजधानी पणजीत पाटो पुलावर रात्रीची स्‍थिती गंभीर; 'नो एन्‍ट्री'तूनही शिरतात वाहने

Drowning Death: कुळेत आणखी दोघांचा बुडून मृत्‍यू, दोघेही मूळ कर्नाटकचे; राज्यात गेल्‍या 21 दिवसांत 12 जणांचा दुर्दैवी अंत

ED Raid Goa: 'साळगावकर' समूहाची 1,023.85 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, अवैध लोहखनिज उत्खननप्रकरणी 'ईडी'ची कारवाई

Horoscope: बुधाच्या राशीबदलाचा मोठा प्रभाव! 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात मिळणार मोठे यश

SCROLL FOR NEXT