Panaji Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa News: पणजीत मद्यधुंद पर्यटकाने महिलांवर फेकले पैसे; कॅसिनोतून बाहेर येऊन केले लाजीरवाणे कृत्य

Panaji Crime News: पणजीतील कार्निव्हलची सांगता झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

Pramod Yadav

पणजी: राज्याच्या राजधानीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यधुंद पर्यटकाने कॅसिनोतून बाहेर येताच एक लाजीरवाणा प्रकार केला. नशेत असलेल्या या पर्यटकाने महिलांवर पैसे फेकत त्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. ०१ मार्च रोजी पणजीतील कार्निव्हलचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पणजी पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ दखल घेऊन मद्यधुंद पर्यटकाला ताब्यात घेतले. गोव्यातील प्रसिद्ध कार्निव्हल उत्सवाला ०१ मार्चपासून सुरुवात झाली. पणजीत या उत्सवाला सुरुवात झाली. कार्निव्हलला हजेरी लावण्यासाठी विविध ठिकाणांवरुन लोकांनी उपस्थिती लावली होती. पणजीतील कार्निव्हलची सांगता झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

नशेत धूत असलेला पर्यटक कॅसिनोतून बाहेर पडला आणि त्याने बाहेर असलेल्या दोन महिलांवर पैसे फेकण्यास सुरुवात केली. या व्यक्तीने त्या महिलांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न देखील केला, अशी माहिती समोर आली आहे. मद्यधुंद पर्यटकाने अंगावरील कपडे काढून गोंधळ घातल्याचे यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले.

संबधित घटनेची पणजी पोलिसांनी माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संबधित पर्यटकाला ताब्यात घेतले. पोलिस अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim: "वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहार, चौकशी व्हावी" गिरीश चोडणकर यांची मागणी

Mapusa: घाऊक मासे विक्रेत्यांच्या किरकोळ विक्रीला हरकत, म्हापसा मार्केटमधील विक्रेते आक्रमक; वाद चिघळण्याची शक्यता

Goa Assembly Session: "कर्ज काढून सण साजरे करू नका", अर्थसंकल्पावर भाष्य करताना युरी आलेमाव यांचा सरकारला टोला

Goa: "सुरक्षारक्षकांच्या वेतनावरील 18% जीएसटी बंद करणार" CM प्रमोद सावंतांचे विधानसभेत आश्‍‍वासन

Goa Rain Update: गोवेकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार, हवामान विभागाकडून 'रेड अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT