Drunk and Drive Accident in Siolim Dainik Gomantak
गोवा

शिवोलीत दारू पिऊन पर्यटकाच्या कारची विजेच्या खांबाला धडक! वीजपुरवठा खंडित, वाहतूक खोळंबली

मध्य प्रदेशातील पर्यटकाची विजेच्या खांबाला धडक

Kavya Powar

Drunk and Drive Accident in Siolim

मागील काही दिवसांमध्ये दारूच्या नशेत वाहन चालवून अपघात होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने राज्यात येणाऱ्या पर्यटकांचा समावेश असतो. अशीच एक घटना शिवोलीमध्ये घडली असून मध्य प्रदेशातील पर्यटकाच्या वाहनाचा अपघात झाला आहे.

माहितीनुसार, गोव्यात आलेल्या मध्य प्रदेशातील पर्यटकाने GA08 V 6196 ही कार भाड्याने एक कार घेतली होती. यावेळी दारूच्या नशेतच तो कार चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी कारवरील नियंत्रण सुटून त्याची विजेच्या खांबाला जोरदार धडक बसली.

ही घटना शिवोलीमधील मार्ना परिसरात घडली आहे. या अपघातानंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये मद्यपान करून वाहन चालवण्याच्या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

घटनास्थळी असलेल्या साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात होण्यापूर्वी ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत होता आणि तो बेपर्वाईने गाडी चालवत होता. त्यामुळेच शेवटी त्याची धडक विजेच्या खांबाला बसली.

या धडकेत विजेच्या खांबाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा तात्पुरता खंडित झाला. याबाबत अधिक तपास सध्या सुरू आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT