Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Police: गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने (एएनसी) गेल्या वर्षभरात राज्यभरातील प्रकरणांमध्ये 3.8 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले.

Manish Jadhav

Goa Police: गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने (एएनसी) गेल्या वर्षभरात राज्यभरातील प्रकरणांमध्ये 3.8 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. उत्तर गोवा एसपी आणि एएनसीचे एसपी अक्षत कौशल यांनी बुधवारी सांगितले, ज्या दिवशी आणखी एक मोठा साठा जप्त करण्यात आला.

कौशल यांनी सांगितले की, बुधवारी एका नायजेरियन महिलेकडून तब्बल 15.1 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. फेथ चिमेरी नावाची ही महिला बंगळुरुहून बसने गोव्यात (Goa) दारुसह आली होती. पीएसआय मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली एएनसीच्या गुप्तहेरांनी तिला म्हापसातील गिरी येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळील बस स्टॉपवर पकडले. महिलेच्या प्राथमिक चौकशीत ती बंगळुरुहून गोव्यात ड्रग्ज विकण्यासाठी आल्याचे उघड झाले. पोलिसांनी तिला 150 ग्रॅम ॲम्फेटामाइन आणि 100 ग्रॅम गांजासह अटक केली.

एएनसीने अलीकडेच बोरी फोंडा येथे हायड्रोपोनिक गांजाच्या लॅबचा पर्दाफाश केला होता. जिथे एका स्थानिक तरुणाला गांजाच्या लागवडीसाठी अटक करण्यात आली, असे कौशल यांनी सांगितले. कौशल यांनी पुढे सांगितले की, गोवा आणि परदेशी नागरिकांसह एकूण नऊ जणांना वेगवेगळ्या अंमली पदार्थांच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, यावर्षी जानेवारी महिन्यात एएनसीने म्हापसा येथील रहिवासी मनीष महाडेश्वर (वय वर्ष 44) याला 55 लाख रुपयांच्या ड्रग्जसह अटक केली होती. ANC अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून 30 किलो गांजा आणि 5 किलो चरस जप्त केले होते. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. प्राथमिक चौकशीत असे समोर आले की, महाडेश्वर आंतरराज्यीय ऑपरेशन चालवत होता. कर्नाटकातून (Karnataka) गांजा आणि हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ प्रदेशातून तो चरस आणायचा. दुसऱ्या एका प्रकरणात, एएनसीने गिरी येथे 10 किलो गांजाच्या खेपेसह ओडिशाच्या एका व्यक्तीला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "हे 33 नरकासुर गोवा जाळतील", श्रीकृष्ण विजयोत्सवात विरोधी पक्षांची वज्रमुठ; सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान?

Quelossim: समुद्र किनाऱ्यावर भरला ‘दिवाळी बाजार’! केळशी पंचायतीचा अभिनव उपक्रम; स्थानिकांसह पर्यटकांनीही घेतला लाभ

Mandrem Accident: भरधाव ट्रकची स्कुटरला धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; पुराव्यांअभावी चालकाची निर्दोष सुटका

Goa Live News: माशे येथे नरकासुर स्पर्धा गोंधळात, दोघांना अटक; नंतर जामीन मंजूर

Anjuna Assault: धारदार शस्त्राने डोक्यावर केला वार, 1 महिन्यानंतर पीडित व्हेंटिलेटरवरच; संशयिताचा जामीन फेटाळला

SCROLL FOR NEXT