Delhi Police Dainik Gomantak
गोवा

Drugs Seized: नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर 2 कोटीचे ड्रग्स जप्त; दिल्ली पोलिसांकडून दोघा गोमंतकीयांना अटक

Drug arrests in Delhi: आरोपींनी नवीन वर्षाच्या पार्टीसाठी ड्रग्ज पुरवण्याची योजना आखली होती.

Akshata Chhatre

दिल्ली: सध्या गोव्यात नवीन वर्षाचा जल्लोष सुरु आहे आणि अशात दिल्ली आणि हिमाचल प्रदेशच्या पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे आणि यामध्ये सामील दोघे गोमंतकीय आहेत. अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतल्याप्रकरणी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. या तिघांना २ कोटी रुपये किमतीच्या मलाना क्रीम या उच्च दर्जाच्या गांजाच्या रेझिनसह पकडण्यात आले. आरोपींनी नवीन वर्षाच्या पार्टीसाठी ड्रग्ज पुरवण्याची योजना आखली होती.

अटक करण्यात आलेला चौहान नावाचा माणूस हिमाचल प्रदेशाचा आहे तर बाकी फर्नांडिस आणि फुर्ताडो हे दोघे गोव्याचे नागरिक आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फर्नांडिस आणि फुर्ताडो हे गोव्यात येणाऱ्या परदेशी लोकांना ड्रग्स पुरवत होते आणि रेव्ह पार्ट्यांमध्ये ड्रग्सचा व्यवसाय चालवत होते.

चौहान हा स्वतः ड्रग एडिक्ट असून पैशांसाठी त्याने ड्रग्सच्या तस्करीला सुरुवात केली. गोव्यात ड्रग्स पोहोचवण्यासाठी त्याला प्रति किलो ५०,००० रुपये मिळत होते आणि हा व्यवसाय चालवण्यासाठी तो दरवर्षी सप्टेंबरनंतर गोव्याला यायचा.

अँग्लो-इंडियन मुळ असलेला फर्नांडिस, मलाना क्रीम थेट स्त्रोताकडून विकत घेण्यासाठी हिमाचल प्रदेशात गेला. अधिकाधिक नफा कमावण्यासाठी फर्नांडिसने गोवा आणि भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये अंमली पदार्थांची जास्ती दराने विक्री करण्याचा प्लॅन बनवला होता. फुर्ताडो हा शिपमेंटमध्ये महत्वाचा भाग सांभाळायचा आणि विविध रेव्ह पार्टीजमध्ये हे ड्रग्स पोहोचवायचा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT