Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Shripad Naik On Drugs: ड्रग्ज हेच गोव्यातील गुन्हेगारीमागचे प्रमुख कारण

पर्यटन क्षेत्रातील अवैध कामांविरोधात मंत्री रोहन खंवटे यांनी घेतलेल्या भुमिकेला पाठिंबा

गोमन्तक डिजिटल टीम

Shripad Naik On Drugs: गोव्यातील सर्व प्रकारच्या गुन्हेगारीमागे ड्रग्ज हेच प्रमुख कारण आहे, असे मत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. गोव्यात पर्यटन क्षेत्रातील बेकायदा घडामोडींना आळा घालण्यासाठी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी आदेश जारी केले आहेत.

उत्तर गोव्याचे खासदार असलेले श्रीपाद नाईक म्हणाले की, गोव्यात सर्व गुन्हेगारीमागे ड्रग्ज हेच प्रमुख कारण आहे. गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील अवैध कामांविरोधात राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी घेतलेल्या भुमिकेला माझा पाठिंबाच आहे. रोहन खंवटे हे बेकायदेशीर कामांविरोधात कारवाई करत आहेत.

केंद्र सरकारदेखील अशा प्रकारे कारवाईसाठी तरतुदी करण्याच्या प्रयत्नात आहे. ठराविक लोकांमुळे गोव्याची बदनामी होत आहे. त्यामुळे गोव्याचे नाव बदनाम होऊ नये, यासाठी केंद्र सरकारही अशाच प्रकारे कारवाईसाठी तरतुदी बनविण्याचा प्रयत्न करत आहे.

गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिलेल्या आदेशांवर गोवा राज्य पर्यटन संचालक निखिल देसाई यांचीही स्वाक्षरी आहे. यात समुद्रकिनारी पर्यटकांची सताणूक करणारे फेरीवाले, मसाज करणारे तसेच बेकायदेशीर गाईड्सच्या टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. राज्याची प्रतिमा बिघडवणारे पर्यटन नको, असे खंवटे यांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT