Drone Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: गोव्यातील खाण क्षेत्रांवर आता ड्रोनची करडी नजर

सरकारने पेडणे तालुक्यात राज्यातील पहिले ड्रोन पार्क कम हब प्रस्तावित केले आहे

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात लवकरच ट्रॅफिक मॅनेजमेंट, खाण क्षेत्राचे निरीक्षण आणि झाडांच्या गणनेसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो कारण सरकारने पडणे तालुक्यात राज्याचे पहिले ड्रोन पार्क कम हब स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

(Drone technology will be developed in Goa to monitor mining areas)

विविध ऍप्लिकेशन्ससाठी ड्रोन म्हणून ओळखल्या जाणार्‍या मानवरहित हवाई वाहनांच्या (UAVs) सतत वाढत्या वापरामुळे, गोवा सरकारने पडणे तालुक्यातील तुये येथील इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टरमध्ये ड्रोन पार्क कम हब स्थापन करण्यासाठी स्वारस्य व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठकी आयोजीत केली आहे. ज्यामध्ये ड्रोन पार्क कम हब स्थापन करण्याबाबत केरळस्थित मेसर्स ऑटोमायक्रोयूएएस एरोटेक प्रायव्हेट लिमिटेड डेमो सादरीकरण करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हबमध्ये ड्रोन उत्पादन प्रकल्प, ड्रोन, रोबोटिक्स, संशोधन आणि विकास केंद्र, ड्रोन फॉरेन्सिक केंद्र, प्रशिक्षण केंद्र आणि Tuem इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टरमध्ये प्लेसमेंट सेल असेल.

सूत्रांनी सांगितले की, कंपनीने वृक्षगणना आणि मोजणी, वन्यजीव प्रगणना, घनकचरा व्यवस्थापनाचे निरीक्षण, वाहतूक व्यवस्थापन आणि खाण क्षेत्रातील निगराणी, आपत्ती व्यवस्थापन आणि कृषी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये ड्रोन आधारित ऍप्लिकेशन्सची अंमलबजावणी करण्यात आपला अनुभव व्यक्त केला आहे.

सरकारी क्षेत्रातील ड्रोन-आधारित सेवांमुळे चांगली कार्यक्षमता आणि जलद परिणाम मिळतील. हे प्रोजेक्ट मॉनिटरिंग, मॅपिंग, मॅनेजमेंट यासह अशी माहिती सूत्रांनी दिली. माहिती तंत्रज्ञानातील तेजीप्रमाणेच केंद्र सरकार ड्रोन बूमचा अंदाज वर्तवत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

2030 पर्यंत भारताला जागतिक ड्रोन हब बनवण्यासाठी भारत सरकारने अनेक सुधारणांच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. ड्रोन एअरस्पेस मॅप गेल्या वर्षी 24 सप्टेंबर रोजी प्रकाशित करण्यात आला होता, ज्यामुळे भारतीय हवाई क्षेत्राचा जवळपास 90 टक्के भाग ड्रोनसाठी ग्रीन झोन म्हणून खुला झाला होता. 400 फूट.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT