Drone Technology Dainik Gomantak
गोवा

Drone Technology : ‘ड्रोन’ तंत्रज्ञान फक्त सासष्टीतच; शेतीसाठी वापर

Drone Technology : लोटलीच्या सोसायटीकडे स्वमालकीचे ड्रोन

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, शेतीमध्ये ड्रोनचा वापर फायदेशीर ठरत आहे; परंतु स्वमालकीच्या ड्रोनचा वापर करावा, एवढे मोठे शेती क्षेत्रही असावे लागते. राज्यात सध्या या तंत्रज्ञानाचा वापर १२ तालुक्यांपैकी केवळ सासष्टी तालुक्यात होत आहे.

ते नावेली, चिंचणी आणि केळशीत दिसून आले आहे. लोटलीच्या डॉन बॉस्को सोसायटीकडे स्वमालकीचे ड्रोन असल्याची लेखी माहिती कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली.

आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नाला मंत्री रवी नाईक यांनी लेखी उत्तर दिले आहे. यांत्रिकी शेती किंवा पारंपरिक शेती करताना त्यासाठी ड्रोनचा वापर किती होतो.

राज्यात किती ठिकाणी याचा वापर केला जातो, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ड्रोनविषयी कोणती योजना उपलब्ध आहे, ड्रोन खरेदीसाठी देऊ केलेली आर्थिक मदत किंवा सवलतीचा तपशील अशा लेखी प्रश्‍नांद्वारे रेजिनाल्ड यांनी मागितला होता.

ड्रोन खरेदीसाठी केंद्र व राज्य सरकारच्यावतीने योजना आहेत. केंद्र सरकारतर्फे कृषी यांत्रिकीकरणाची योजना असून, त्यासाठी शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी आर्थिक मदत केली आहे. ड्रोनच्या मूळ किमतीच्या ४० टक्के आणि संबंधितास कमाल ४ लाखांपर्यंत केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत मदत मिळू शकते.

कृषी-राज्य क्षेत्रातील यांत्रिकीकरण योजनेखाली ड्रोन खरेदीसाठी ड्रोनच्या मूळ किमतीच्या दहा टक्के दराने मदत आणि राज्याच्यावतीने १ लाखांपर्यंत मदत दिली जाते. याशिवाय नमो ड्रोन दीदी आर्थिक साहाय्य योजनेंतर्गत ड्रोनच्या किमतीच्या ८० टक्के साहाय्य आणि ॲक्सेसरीज शुल्क दिले जाते. जास्तीत जास्त महिलांच्या बचत गटांनाही ८ लाख रुपये लाख रुपये दिले जातात, असे लेखी उत्तरात म्हटले आहे.

‘ड्रोन यात्रे’चे आयोजन

सध्या बाजारात कृषी ड्रोन ७.५० लाख ते १२ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्याशिवाय उच्च-तंत्रज्ञानयुक्त ड्रोन १५ लाखांपासून सुरू होतात. दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये जागृतीसाठी कृषी खात्याच्यावतीने ‘ड्रोन यात्रा’ही आयोजित केली होती. याशिवाय सरकारकडून ड्रोन खरेदीसाठी मिळणाऱ्या सवलतीची माहितीही दिली जात असल्याचे उत्तरात नमूद केले आहे.

डोंगरउतारावर होते पारंपरिक शेती

आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी आधुनिक शेती पद्धती वापरणाऱ्या शेतकऱ्यांची एकूण संख्या तथा अत्याधुनिक यांत्रिकीकरणाविषयी, तसेच अजूनही किती शेतकरी पारंपरिक शेती करतात, याविषयी माहिती मागितली होती, त्यावर मंत्री नाईक यांनी राज्यात अत्याधुनिक शेतीचा वापर करणारे एकूण ३६ हजार ७५ शेतकरी आहेत.

२ याशिवाय शेतकरी माती परीक्षणही करून घेत असतात, तसेच अजूनही काही शेतकरी पारंपरिक शेतीचा वापर करत आहेत. वैविध्यपूर्ण आकाराची शेतजमीन, डोंगरउतारावर जमीन जेथे यंत्रसामग्री घेऊन जाणे कठीण असते, अशा ठिकाणी पारंपरिक शेतीचाच वापर होत असल्याचे लेखी उत्तरात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

Goa PSC Chairman Appointment: 'गोवा लोकसेवा' अध्यक्ष नियुक्तीला हायकोर्टात आव्हान; राज्य सरकारसह उदयसिंह रावराणे यांना नोटीस

SCROLL FOR NEXT