Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवासाठी '14 ऑगस्ट' खास! आजच्याच दिवशी ठोकलं होतं पहिलं कसोटी शतक; 35 वर्षांनंतरही 'त्या' रेकॉर्डची आठवण कायम

Sachin Tendulkar Record: महान फलंदाज आणि 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरने भारताकडून खेळताना अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले.
Sachin Tendulkar News
Sachin TendulkarDainik Gomantak
Published on
Updated on

Sachin Tendulkar Record: महान फलंदाज आणि 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरने भारताकडून खेळताना अनेक मोठे रेकॉर्ड प्रस्थापित केले. त्याचे काही रेकॉर्ड असे आहेत, जे आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही आणि भविष्यात ते मोडणेही कठीण आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके ठोकणारा सचिन हा जगातील एकमेव फलंदाज आहे. मास्टर ब्लास्टरसाठी 14 ऑगस्ट हा दिवस अत्यंत खास आहे, कारण याच दिवशी त्याने असा पराक्रम केला होता की, ज्यामुळे क्रिकेट जगताने त्याची दखल घेतली.

14 ऑगस्ट 1990 रोजी पहिले कसोटी शतक

दरम्यान, क्रिकेटच्या जगात 14 ऑगस्ट हा दिवस नेहमीच अविस्मरणीय राहील. आजच्याच दिवशी म्हणजे 14 ऑगस्ट 1990 रोजी सचिन तेंडुलकर यांनी इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आपल्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक झळकावले होते. अवघ्या 17 वर्षांच्या सचिनने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत दुसऱ्या डावात 119 धावांची नाबाद खेळी केली होती, ज्यात 17 चौकारांचा समावेश होता. या सामन्याच्या पहिल्या डावातही त्यांनी 68 धावा केल्या होत्या. सचिनच्या या शानदार प्रदर्शनामुळे त्याला सामनावीर ( Player 0f The Match) म्हणून गौरवण्यात आले होते. हा सामना जरी ड्रॉ झाला असला, तरी इथूनच सचिनच्या कारकिर्दीला एक नवी दिशा मिळाली.

Sachin Tendulkar News
Sachin Tendulkar Video: 'तूच खरा हिरो...', सचिनने शब्द पाळला, अपघातात हात गमावूनही क्रिकेट खेळणाऱ्या अमीरची घेतली भेट

विक्रमांचा बादशाह सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर हा एकमेव असा फलंदाज आहे, ज्याने सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत भारतीय संघासाठी 200 कसोटी सामने खेळले. यात फलंदाजी करताना त्याने सर्वाधिक 15,921 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 51 शतके आणि 68 अर्धशतके आहेत. कसोटी क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम खेळी 248 धावांची नाबाद होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे.

Sachin Tendulkar News
Sachin Tendulkar: काश्मीरमधील बॅट फॅक्टरीच्या भेटीनंतर रस्त्यावर उतरत मास्टर-ब्लास्टरची फटकेबाजी, Video Viral

त्याशिवाय, सचिनच्या एकदिवसीय (वनडे) कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 463 सामने खेळले. त्यात त्याने 18,426 धावा केल्या. या दरम्यान, त्याच्या बॅटमधून 49 शतके आणि 96 अर्धशतके निघाली. एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनची सर्वोत्तम खेळी 200 धावांची नाबाद होती, जे एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com