Smart Signals in Goa Dainik Gomantak
गोवा

Smart Signals in Goa : वाहनचालकांनो सावधान! गोव्यात मार्चपासून स्मार्ट सिग्नल्स आणि हायटेक कॅमेरे

रुग्णवाहिका आणि पेट्रोलिंग टिम तैनात ठेवण्याचा प्रस्ताव

Rajat Sawant

Smart Signals in Goa : राज्यात सातत्याने अपघातांत होणारी वाढ, दिवसेंदिवस वाढलेले अनियंत्रित वाहतुकीचे प्रमाण, वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांत पडणारी भर चिंताजनक आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक खाते आता राज्यात स्मार्ट सिग्नल्स कार्यान्वित करणार आहे.

सध्याच्या सिग्नल्स मध्ये बदल करुन स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्ट सिग्नल्स बसविण्यात येणार आहेत. काही ठिकाणी असे सिग्नल्स बसविण्यात आले असून याची चाचणीदेखील सुरु केली आहे. याबातची माहिती वाहतूक खात्याकडून देण्यात आली आहे.

सिग्नल्सवर बसविलेलेट हायटेक कॅमेरे हे फक्त वाहतुकीवर नजर ठेवणार नाहीत तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरदेखील नजर असणार आहे.हे कॅमेरे एवढे हायटेक असतील की, याद्वारे सिग्नल्स तोडणाऱ्यांचा वाहन क्रमांक तसेच वाहन चालकाने सिटबेल्ट घातला आहे की नाही याचे स्पष्ट चित्रीकरण कॅप्चर केले जाणार आहे.

या सिग्नल्स आणि वाहतूकीवर नजर ठेवण्यासाठी स्मार्ट सिटीची खास कंट्रोल रुम उभारण्यात येणार आहे. येथूनच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कंट्रोल रुममध्ये वाहतूक पोलिसांना बसण्यासाठी खास आसनव्यवस्था असणार आहे. ही नवी प्रणाली मार्चपासून कार्यान्वयीत करण्यात येणार आहे.

राज्यात अपघात वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तर गोव्यात पत्रादेवी ते म्हापसा आणि म्हापसा ते पणजी या महामार्गावर तसेच दक्षिण गोव्यात वेर्णा ते मडगाव आणि मडगाव ते राज्याच्या सीमेपर्यंत अशा महामार्गांवर चार ठिकाणी रुग्णवाहिका आणि पेट्रोलिंग टीम तैनात ठेवण्यात येणार आहे.

अपघात झाल्यास त्वरित मदत मिळू शकेल याची सोय केली जाणार आहे. या गोष्टींचा विचार करुन याबाबतचा प्रस्ताव वाहतूक खाते सरकारला देणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AFC Champions League: FC Goa भिडणार रोनाल्डोच्या टीमशी! अल नस्सरविरुद्ध परतीचा सामना; सौदी अरेबियन प्रतिस्पर्ध्यांचे कडवे आव्हान

Edberg Pereira Assault: पोलिसांकडून मारहाण झालेल्‍या 'एडबर्ग'ची प्रकृती बिघडली! ICUत केले दाखल; प्रकरण क्राइम ब्रँचकडे सुपूर्द

C K Nayudu Trophy: 17 चौकार, 13 षटकार! 'शिवेंद्र'च्या तडाख्यामुळे गोवा सुस्थितीत; मेघालयाविरुद्ध 270 धावांची आघाडी

Goa Accident Death: भरधाव टँकर येऊन आदळला, कारचा चक्काचूर; दोघाजणांच्या अपघाती मृत्यूमुळे क्रीडाक्षेत्रात हळहळ

Goa Crime: अडीच वर्षीय मुलीच्या खूनप्रकरणी 'मास्टरमाईंड'ला 7 दिवसांची पोलिस कोठडी, संशयित बंगळूरुतून अटकेत; डिचोली पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT