Science Fiesta 2023: मिरामार येथील विज्ञान केंद्रात शनिवारपासून विज्ञान महोत्सव, जाणून घ्या वेळापत्रक

मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्रात उद्यापासून (शनिवार, दि.25) विज्ञान महोत्सव सुरू होणार आहे.
Science Fiesta 2023
Science Fiesta 2023Dainik Gomantak

गोवा विज्ञान केंद्राच्या वतीने विज्ञान महोत्सवाचे (सायन्स फिएस्टा)-2023 आयोजन करण्यात आले आहे. गोवा सरकारच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभागाच्या सहकार्याने 25 ते 28 फेब्रुवारी 2023 दरम्यान विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. (Goa Science Center and Planetarium Science Fiesta 2023)

मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्रात उद्यापासून (शनिवार, दि.25) विज्ञान महोत्सव सुरू होणार आहे.

Science Fiesta 2023
Science Fiesta 2023PIB Goa

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून विज्ञान महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. देशातील आघाडीच्या वैज्ञानिक आणि संशोधन संस्था या कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि सामाजिक हिताच्या दृष्टीने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या महत्त्वपूर्ण विकासावर प्रकाश टाकणारे हे प्रदर्शन असेल.

Science Fiesta 2023
Calangute Restaurant Fire: कळंगुट-बागा येथील क्लबला आग
Science Fiesta 2023:
Science Fiesta 2023: PIB Goa

विज्ञान प्रदर्शन 25 पासून 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत सर्वांसाठी खुले राहील.

सायन्स फिएस्टा- 2023 चे उद्घाटन 25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे संचालक प्रो. सुनील कुमार सिंग यांच्या हस्ते होणार आहे. युवा पिढीत विज्ञानाची गोडी निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमादरम्यान अनेक स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com