Mayem Van Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: मयेत व्हॅनची झाडाला धडक चालक गंभीर, गोमेकॉत दाखल

Goa Accident Case: खमीवर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

दैनिक गोमन्तक

Mayem Accident Case: मये-पैरा रस्त्यावरील अर्धवाडा-मये परिसरात शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास रस्त्यालगतच्या फणसाच्या झाडाला कारची धडक बसून झालेल्या अपघातात पैरा येथील चालक युवक गणेश घाटवळ हा गंभीर जखमी झाला.

जखमीवर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

प्राप्त माहितीनुसार गणेश घाटवळ याचा एक पाय मोडला असून मूत्रपिंडालाही मार बसला आहे.या अपघातात कारची पूर्णतः मोडतोड झाली. चालकाचे नियंत्रण गेल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

उपलब्ध माहिती अशी, की (जीए-०४-ई-३६७१) ही व्हॅन पैराच्या दिशेने जाताना अर्धवाडा-मये येथे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या फणसाच्या झाडाला व्हॅनची धडक बसली.

धडक एवढी जबरदस्त होती, की आवाजाबरोबर शेजारील घरांतील लोक जागे झाले. त्यांनी बाहेर धाव घेऊन गाडीत अडकलेल्या चालकाला बऱ्याच प्रयत्नाअंती बाहेर काढून लागलीच त्याला इस्पितळात नेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT