Drishti Lifeguard Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात बीचवरून बेपत्ता झालेल्या 264 लहानग्यांचा शोध तर 91 मुलांना जीवदान; दृष्टीवर कौतुकाची थाप

Pramod Yadav

Drishti Marine’s lifesavers: गोव्यातील दृष्टी सागरी जीवरक्षकांनी गेल्या दोन वर्षांत गोव्याच्या समुद्रकिना-यावर 91 मुलांना जीवदान दिले आहे. गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (GSCPCR) याबाबत दृष्टीचे कौतुक केले आहे.

दृष्टीने दाखवलेल्या धैर्य आणि धाडसाचे आयोगाने कौतुक केले आहे. दोन फ्रेंच मुलांचा बचाव केल्यानंतर आयोगाने दृष्टीबाबत वक्तव्य केले आहे.

'समुद्रकिनाऱ्यांवर तैनात असलेले जीवनरक्षक केवळ त्यांचा वेळच नव्हे तर आपल्या सर्वांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी जीवन समर्पित करतात. बीचवर मुलांना दुखापत होणे किंवा जीवघेण्या अपघातांपासून वाचवण्यासाठी सूचना देत असतात. तसेच, त्यांच्यावर सतत लक्ष ठेवतात.' असे GSCPCR चे अध्यक्ष अध्यक्ष पीटर बोर्जेस यांनी दृष्टी मरीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नवीन अवस्थी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

बोर्जेस यांनी समुद्रकिनाऱ्यांवरील जीवनरक्षकांचे वर्णन "असंग हिरो" असे केले आहे. जीवनरक्षक लहान मुलांना समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षितता देण्यासाठी काम करतात. पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येईल यासाठी तसेच, कोणताही अपघात होणार नाही याची काळजी घेतात. असे बोर्जेस म्हणाले.

दृष्टी सागरी जीवरक्षकांनी गेल्या दोन वर्षांत गोव्याच्या समुद्रकिना-यावर 91 मुलांना जीवदान दिले, तसेच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करणे देखील केले. याशिवाय जीवरक्षकांनी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर तीन मागील वर्षात बेपत्ता झालेल्या 264 मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन केले.

मांद्रे येथे समुद्रात गेलेल्या दोन फ्रेंच मुलांना जीवदान

दोन दिवसांपूर्वी मांद्रे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्यांपैकी दोन फ्रेंच वंशाची मुले पोहण्यासाठी समुद्रात गेले. थोडे पुढे गेल्यानंतर आलेल्या लाटेत दोघेही गुरफटले. लाटेत अडकून पडल्याने त्यांना पोहत माघारी येणे अवघड झाले. दृष्टी जीवरक्षकांनी दोघांना सुखरूप बाहेर काढले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT