Drishti Lifeguard Goa Dainik Gomantak
गोवा

Drishti Lifeguards : गोव्यात 5 पर्यटकांना जीवदान; दृष्टी जीवरक्षकांची कामगिरी

आठवड्याच्या शेवटी जीवरक्षकांनी 5 पर्यटकांना वाचवले आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात जलक्रीडा करण्यासाठी अनेक पर्यटक इथे येत असतात. यावेळी अतिउत्साहाच्या अनेक पर्यटकांसोबत अपघात घडतो. आठवड्याच्या शेवटी जीवरक्षकांनी 5 पर्यटकांना वाचवले आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील एक पर्यटक पाळोळे येथे कयाकिंग करत होता, तसेच कळंगुट, सिकेरी आणि हणजूण इथे जलक्रीडा करणाऱ्या काही पर्यटकांचा यात समावेश आहे. (Drishti Lifeguards save 5 tourists from different beach)

सिकेरीच्या घटनेत, पुण्यातील 25 वर्षीय महिला सिकेरी समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ भागात अडकलेल्या अवस्थेत आढळली. तिला दुखापत होण्याच्या भीतीने आणि किना-यापर्यंत पोहता येत नसल्याने तिने जीवरक्षकांना मदतीचा इशारा केला. महिला सुरक्षितपणे किनाऱ्यावर परत आली याची खात्री करण्यासाठी जीवरक्षकांनी रेस्क्यू ट्यूबचा वापर केला.

दृष्टीतर्फे दिलेल्या माहितीनुसार, कळंगुट येथे हैदराबाद येथील 23 आणि 30 वर्षांचे दोन पर्यटक हे पाण्याच्या प्रवाहात अडकले होते. त्यांना जीवरक्षकांनी रेस्क्यू ट्यूब आणि सर्फबोर्डच्या साहाय्याने किना-यावर परत आणले.

पाळोळे बीचवर कोलकाता येथील एक 30 वर्षीय पर्यटक कयाकिंग करत असताना अचानक त्याचे नियंत्रण सुटले आणि त्याचा तोल गेला. या गोष्टीने खळबळ होताच जीवरक्षकांनी प्रसंगावधान दाखवत त्याचा जीव वाचवला.

आणखी एक घटना म्हणजे दिल्लीतील 38 वर्षीय पर्यटकाला हणजूण इथे जलक्रीडा करत असताना जीवदान देण्यात आले. तो एका मोठ्या लाटेत अडकला आणि परत किनाऱ्यावर जाण्यासाठी तो धडपडत होता. त्याच्या बचावासाठी सर्फबोर्डचा वापर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

धारगळच्या कमांड एरियातील जमीन केवळ कॅसिनोसाठी डेल्टा कंपनीला दिली; आलेमाव यांचा आरोप

Goa University: प्रेयसीसाठी प्राध्यापकाने प्रश्नपत्रिका चोरी केल्याचे प्रकरण विधानसभेत गाजले; कायद्यात दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT