Calangute Beach Dainik GOmantak
गोवा

Calangute Beach: समुद्रकिनारी मद्यपान करणाऱ्यांना आवरण्याची गरज

''मद्यपान झाले की, पर्यटक काचेच्या बाटल्या समुद्रकिनाऱ्यावर रचतात किंवा एका खड्ड्यात पुरतात''

दैनिक गोमन्तक

गोवा राज्यात पर्यटन हंगाम नुकताच सुरू झाला असुन यामुळे देश-विदेशातील प्रदेश पर्यटक गोव्यात दाखल होत आहेत. काही देशांना व्हिसा ऑनलाईन मिळत नसल्याने गोव्यामध्ये बाहेरील देशांचे पर्यटक कमी प्रमाणात येत असले तरी देशी पर्यटक मात्र मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. असे असताना गोव्यातील काही समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक उघड्यावर मद्यपान करताना दिसत आहेत.

(drinking in open on the beach is prohibited yet people seen drinking at Calangute beach)

मिळालेल्या माहितीनुसार कळंगुट येथील समुद्रकिनाऱ्यावर काही पर्यटक मद्यपान करताना दिसले आहेत. दिवसेंदिवस असे पर्यटकांची संख्या वाढत असताना समोर येत असल्याने असे प्रकार इतर पर्यटकांना त्रासदायक ठरु लागले आहे. काद्यानुसार गोवा राज्यात उघड्यावर मद्यपान करण्यास मनाई असताना हे प्रकार सासत्याने समोर येत असल्याने IRB काय करत आहे? असा सवाल आता सामान्य पर्यटक आणि स्थानिक विचारु लागले आहेत.

समुद्रकिनाऱ्यावर मद्यपान करताना याविरुद्ध चेतावणी देणारे फलक लावले आहेत. तसेच दंड आकारण्यात येत असूनही, पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर दारूचे बॉक्स घेऊन येताना दिसत आहेत. यामूळे “IRB च्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह तयार झाले आहे.

याबाबत गोवा शॅक असोसिएशनचे सरचिटणीस जॉन लोबो म्हणाले की, समुद्रकिनाऱ्यावर काचेच्या बाटल्यांना परवानगी दिली जाऊ नये. लोक वाइन स्टोअरमधून दारु विकत घेतात आणि बॉक्ससह समुद्रकिनाऱ्यावर येतात. आणि याचा वापर झाला की, धोकादायकरित्या समुद्रकिनाऱ्यावर रचून ठेवतात किंवा एक खड्डा खणून त्यामध्ये पुरतात. हे अत्यंत धोकादायक असून याला आवर घालणे आवश्यक आहे. अथवा याचा मोठा फटका बसू शकतो अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shocking: क्रिकेट जगतात खळबळ! ड्रग्जच्या व्यसनामुळं दिग्गज क्रिकेटपटूची कारकीर्द उद्ध्वस्त, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमची 'एक्झिट'

Chhattisgarh Train Accident: छत्तीसगढमध्ये मोठा रेल्वे अपघात! लोकल ट्रेनची मालगाडीला जोरदार धडक,10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी; प्रवाशांची धावपळ VIDEO

Vaibhav Suryavanshi Record: 9 चौकार, 4 षटकार... 'टेस्ट'मध्ये 'टी-20' सारखा धमाका, 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं पुन्हा इतिहास रचला

Pirna Murder Case: पीर्ण खून प्रकरणी कोलवाळ पोलिसांना मोठं यश, दोन आरोपींनी केले आत्मसमर्पण; लवकरच होणार मोठा उलगडा?

VIDEO: बाणावली बीचवर 'डॉल्फिन'चं दर्शन! मच्छीमार पेले यांनी शेअर केलेला व्हिडिओ Viral, समुद्रातील अद्भुत दृश्य एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT