Mavin Gudinho Dainik Gomantak
गोवा

गोवा औद्योगिक वाढ आणि प्रोत्साहन धोरण 2022 चा मसुदा जाहीर

आगामी विधानसभा अधिवेशनापर्यंत हे धोरण सार्वजनिक आणि उद्योगांच्या छाननी आणि सूचनांसाठी खुले असेल

दैनिक गोमन्तक

गोवा: उद्योग, व्यापार आणि वाणिज्य मंत्री माविन गुदिन्हो यांनी आज राज्यासाठी नवीन औद्योगिक धोरणाचा मसुदा प्रसिद्ध केला; तसेच “गोवा औद्योगिक वाढ आणि प्रोत्साहन धोरण 2022” आगामी विधानसभा अधिवेशनापर्यंत हे धोरण सार्वजनिक आणि उद्योगांच्या छाननी आणि सूचनांसाठी खुले असेल, असेही ते म्हणाले.

(Draft Goa Industrial Growth and Promotion policy 2022 released)

माविन गुदिन्हो पुढे म्हणाले की, नवीन धोरणातील व्यवसाय सुलभता (EoDB) सुधारणा, जमिनीशी संबंधित सुधारणा, विद्यमान, स्थानिक आणि नवीन व्यवसायांसाठी प्रोत्साहन इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच, मंत्र्यांनी आश्वासन दिले की धोरणात योग्य तरतुदी केल्या जातील. सध्याच्या उद्योगांसाठी तसेच गोव्यात दुकाने थाटण्याची योजना आखणाऱ्या उद्योगांच्या सोयीसाठी प्रभावी आणि कालबद्ध सिंगल विंडो क्लिअरन्स यंत्रणा अस्तित्वात आहे.

मोठ्या उद्योगांना परवानग्या देण्यासाठी जास्तीत जास्त 3 महिने आणि छोट्या उद्योगांसाठी 2 महिन्यांचा कालावधी असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. “एकच अर्ज सर्व विभागांना पाठवला जाईल. जमीन वापरात बदल करण्यासाठी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाला अधिकार दिले जातील, धोरणात स्थानिक रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहनाच्या तरतुदी आहेत, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT