Dr. Francisco Luís Gomes154th death anniversary Dainik Gomantak
गोवा

Salcete News : डॉ. गोम्स यांच्या कांस्य पुतळ्याची उभारणी लवकरच ; १५४ व्या पुण्यातिथी दिनी संकल्प

आपण राज्यसभा खासदार असताना खासदार निधीतून या कामासाठी मंजुरी मिळविली होती व २५ लाख रुपये मंजूर केले होते. आता लवकरच पुतळा उभारला जाणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Salcete News: सासष्टी, : गोव्याचे माजी प्रसिद्ध डॉक्टर, लेखक, इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ व पोर्तुगीज संसदेतील माजी खासदार डॉ. फ्रांसिस लुईस गोम्स यांच्या कांस्य पुतळ्याची उभारणी पुढील दीड ते दोन महिन्यात पूर्ण होईल, असे माजी खासदार लुईझिन फालेरो यांनी सांगितले.

यावेळी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, रेव्ह फा. गाब्रिएल कुतिन्हो, सरपंच लुसिया कार्वाल्हो उपस्थित होते. डॉ. गोम्स यांच्या १५४ व्या पुण्यातिथी दिनी आयोजित कार्यक्रमात फालेरो ते बोलत होते.

फालेरो म्हणाले, की आपण राज्यसभा खासदार असताना खासदार निधीतून या कामासाठी मंजुरी मिळविली होती व २५ लाख रुपये मंजूर केले होते. आता लवकरच पुतळा उभारला जाणार आहे. सार्दिन यांनी आणखी ३५ लाख रुपये मंजूर करुन घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.

घराची दुरुस्ती करा

कोलमोरोड, नावेली येथे ज्या घरात डॉ. गोम्स रहात होते ते अगदी मोडकळीस आले आहे. या घराची दुरुस्ती त्याची देखभाल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

मडगावचे माजी नगराध्यक्ष व शेडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी सांगितले, की डॉ. गोम्स यांच्या घराचे जतन करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र त्यासाठी सरकारची अनास्था दिसून येत आहे. हे घर दुरुस्त करुन त्यात संग्रहालय सुरु करणे उचित ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT