Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Rape Case: डॉ. प्रकाश अवदी यांच्याविरोधात आणखी एक विनयभंगाचा गुन्‍हा नोंद

आतापर्यंत डॉ. अवदी यांच्‍या विरोधात विनयभंगाचे एकूण दोन गुन्‍हे नोंद झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

तपासण्‍यासाठी आलेल्‍या एका युवतीचा विनयभंग केल्‍याच्‍या आरोपाखाली गुन्‍हा नोंद करण्‍यात आलेले मडगाव येथील प्रसिद्ध डाॅ. प्रकाश अवदी यांच्‍या विरोधात मडगाव पोलिसांनी आणखी एक विनयभंगाचा गुन्‍हा नोंद केला आहे. आतापर्यंत डॉ. अवदी यांच्‍या विरोधात विनयभंगाचे एकूण दोन गुन्‍हे नोंद झाले आहेत.

2017 साली आपण डॉ. अवदी यांच्‍या दवाखान्‍यात तपासण्‍यास गेले असता त्‍यांनी आपला विनयभंग केला, अशा आशयाची तक्रार फातोर्डा येथील एका युवतीने यापूर्वी मडगाव पोलिसांत दिली होती. मात्र, तपास करण्‍याच्‍या निमित्ताने ही तक्रार नोंद करण्‍यात आली नव्‍हती. सोमवारी (ता.२८) ही तक्रार गुन्‍हा म्‍हणून नोंद करण्‍यात आल्‍याची माहिती मडगाव पोलिसांनी दिली. दरम्‍यान, पैसे उकळण्‍यासाठी या तक्रारी दाखल केल्‍याची भूमिका डाॅक्‍टरांच्‍या कुटुंबीयांनी घेतली आहे.

दिग्विजीत चव्हाणच्या विरोधात गुन्हा नोंदवा

नावेली येथील व्यावसायिक दिग्विजीत चव्हाण याने मडगाव येथील प्रसिद्ध डॉ. प्रकाश अवदी यांच्या पुत्राकडून फक्त २५ लाखांची खंडणी मागितली एवढेच नव्हे तर डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन त्यांना धमकावले, असा दावा त्यांच्या वकिलांनी मंगळवारी न्यायालयात करून चव्हाण याच्याविरोधात वैद्यकीय व्यावसायिक संरक्षण कायद्याखाली गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली.

दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश शमा जोशी यांच्यासमोर मंगळवारी (ता.२९) हा युक्तिवाद झाला. चव्हाण याने आपल्याला या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला असून त्यावरील युक्तिवाद ऐकून घेतल्यावर त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत निकाल राखून ठेवला.

वकिलांचे न्यायालयातील युक्तिवाद...

  • मडगाव पोलिसांच्या वतीने बाजू मांडताना सरकारी वकील देवानंद कोरगावकर यांनी चव्हाण याने ज्या फोनवरून ही खंडणी मागितली तो फोन जप्त करण्याची गरज व्यक्त केली.

  • चव्हाण याने आपला वास्तव्याचा पत्ता जो न्यायालयात दिला आहे, त्या पत्त्यावर अर्जदार मागची दहा वर्षे राहत नसल्याचे उघडकीस आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

  • चव्हाण याच्या वतीने बाजू मांडताना ॲड. स्पेंसर व्हिएगस यांनी आपल्या अशिलाचा फोन पोलिसांना जप्त करायचा असल्यास त्याला काहीच हरकत नसल्याचा दावा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

Bull Fight Viral Video: रस्त्यावर जनावरांचा थरार अन्...! बैलाची स्कूटीला जोरदार धडक; अंगावर काटा आणणार व्हिडिओ तूफान व्हायरल

Goa RGP: 'गोमंतकीयांचे हित जपणारे सरकार हवे'; बोरकरांचा निर्धार! 'आरजी'च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सज्ज

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

SCROLL FOR NEXT