Court Canva
गोवा

Dowry Case: 2 लाखांच्या हुंड्यासाठी केला मानसिक, शारीरिक छळ; महिलेची तक्रार; 12 वर्षांनंतर पतीसह 5 आरोपी निर्दोष

Dowry Case Goa: निवाडा देताना न्‍यायालयाने म्‍हटले की, भारतीय दंड संहितेच्‍या कलम ४९८(अ) अंतर्गत सरकारी पक्ष आरोप सिद्ध करू शकला नाही. पीडितेच्या वडिलांना तक्रारीबाबत माहिती नव्हती.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हुंडाप्रकरणी मानसिक व शारीरिक छळाच्या आरोपाखाली सुरू असलेल्या खटल्यातून अकसर अली, जमिला अली, सलिमा होंबार्डी, फमिदा अली आणि खुदबद्दीन होंबार्डी यांना न्यायालयाने बारा वर्षांनंतर निर्दोष मुक्त केले.

या प्रकरणात त्यांच्यावर २ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी अकसरची पत्नी अफरीन चिगरिहल्ली हिचा छळ केल्याचा आरोप होता. तसे आरोपपत्रही दाखल झाले होते.

निवाडा देताना न्‍यायालयाने म्‍हटले की, भारतीय दंड संहितेच्‍या कलम ४९८(अ) अंतर्गत सरकारी पक्ष आरोप सिद्ध करू शकला नाही. पीडितेच्या वडिलांना तक्रारीबाबत माहिती नव्हती. पंचनामा विश्‍‍वसनीय नव्हता आणि वैद्यकीय पुरावेही अपुरे ठरले.

न्यायालयाचे निरीक्षण

न्यायाधीश अक्षता काळे यांनी नमूद केले की, अस्पष्ट आणि सर्वसाधारण आरोपांवरून कलम ४९८ (अ) अंतर्गत आरोप सिद्ध होऊ शकत नाही. पीडितेच्या साक्षीवर संपूर्ण खटला उभा होता, परंतु हुंड्याची मागणी कधी, कुठे व कोणासमोर केली गेली, हे स्पष्ट नसल्याने पुरावा अपुरा ठरला. सरकारी पक्षाने सुनावणीदरम्यान आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे पुरेसे नसल्याची कबुली दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Naik: गोंयचो पात्रांव अनंतांन विलीन! रवी नाईक यांना 21 बंदुकींच्या सलामीसह अखेरचा निरोप

Bicholim: मोठी दुर्घटना टळली! डिचोलीत सिलिंडर गळतीमुळे शेगडी पेटली, फ्लॅटमालक आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, लोक ओक्साबोक्शी रडले; रवींच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर

राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू, सहा दिवसांसाठी मुख्यमंत्री ते गोव्याच्या राजकारणाचे 'कर्णधार'; 'रवी नाईक' यांची अनोखी कहाणी!

Viral Video: डोनाल्ड ट्रम्प माझे पप्पा...! राखी सावंतचा ट्रम्प कनेक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ, नेटकरी म्हणाले, "अमेरिकेची पुढची प्रेसिडेंट राखी ट्रम्प"

SCROLL FOR NEXT