सासष्टी: लेखा (अकाऊंटिंग) सुधारणेत सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल दवर्ली-दिकरपाल पंचायतीला ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया’ने ‘आयसीएआय’चा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान केला. हा पुरस्कार दवर्लीचे सरपंच साईश ऊर्फ श्याम राजाध्यक्ष आणि सचिव प्रदीप ताम्हणकर यांनी नवी दिल्लीतील समारंभात स्वीकारला. हा पुरस्कार त्यांनी केंद्रीय कायदा व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते व ‘आयसीएआय’चे अध्यक्ष रणजीत कुमार अग्रवाल आणि ‘सीपीजीएफएम’च्या अध्यक्ष केमिशा सोनी यांच्या उपस्थितीत स्वीकारला.
नवी दिल्लीतील यशोभूमी येथे जागतिक ‘फोरम अकाऊंटंट्स’ हा कार्यक्रम ‘आयसीएआय’ने आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भारतासह (India) ४२ देशांचे ६ हजार प्रतिनिधी उपस्थित होते. हा पुरस्कार स्वीकारताना मन आणि हृदय अभिमानाने भरून आले, असे राजाध्यक्ष यांनी नवी दिल्लीतून ‘गोमन्तक’ला सांगितले. ‘आयसीएआय’ने १६ तज्ज्ञांची समिती नियुक्त केली होती. या समितीने आमच्या पंचायतीच्या हिशेबाची माहिती मिळविली होती. हा पुरस्कार प्राप्त करणारी दवर्ली ही देशातील एकमेव पंचायत आहे याचा अभिमान वाटतो, असे राजाध्यक्ष म्हणाले.
देशातील एक प्रगतशील पंचायत बनविण्याचा निर्धार केला असून सहकारी पंच आणि स्थानिकांनी माझ्यावर विश्र्वास ठेवून जबाबदारी सोपविली, ती यशस्वी करून दाखविण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, सहकारी पंच आणि सरकारचे आभार मानतो, असेही राजाध्यक्ष यांनी सांगितले.
दवर्लीत सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली आहे. अतिक्रमणे व बेकायदेशीर बांधकामांवर नियंत्रण राखले आहे. महत्त्वाचे म्हणजे, सरकारी अनुदानाचा योग्य कामांसाठी वापरला जातो, असे सरपंच राजाध्यक्ष यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.