Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेऊ नका : शिवप्रेमींची मागणी

Goa News : पुतळ्यासाठी परवानगी घेतल्याचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

सासष्टी, सां जुझे द आरियल येथील पाद्रीभाट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीवरून जो वाद सुरू आहे तो अजून संपलेला नाही.

आज येथील शिवप्रेमींनी मडगावात पत्रकार परिषद घेऊन ज्या २० ग्रामस्थांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, ते मागे घेऊ नये, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर शिवरायांचा पुतळा उभारणीसाठी आवश्यक परवानगी असल्याचाही दावा केला.

ज्यांच्या जमिनीवर शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे, त्याचे मालक मेहबूब मुकांदर यांच्यासह आनंद तांडेल व सां जुझे आरियल व परिसरातील शिवप्रेमी या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांना जमिनीची सर्व कागदपत्रे दाखवूनही तेथील लोकांना त्यांनी चिथावण्याचा प्रयत्न केला. सध्या तात्पुरते बांधकाम करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला आहे.

पुतळ्याचे निमित्त करून तेथे रस्ता तयार करण्याचा प्रश्र्नच उद्‍भवत नाही. कारण तेथे पूर्वीच ६ मीटर रुंदीचा रस्ता आहे. शिवाय काहींनी रस्त्यासाठी पूर्वीच ना हरकत दाखला दिलेला आहे. आपला या जमिनीचे प्लॉट करून विकण्याचा मुळीच इरादा नाही.

- मेहबूब मुकांदर, जमिनीचे मालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT