Don't allow rebels to re-enter the party 
गोवा

बंडखोरांना पुन्‍हा प्रवेश नकोच

गोमंतक वृत्तसंस्था

पणजी : १८ आमदारांपैकी अवघे ५ आमदार शिल्लक राहिलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव यांना निष्‍ठावंत कार्यकर्त्यांच्‍या रोषाला सामोरे जावे लागले. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्‍या बंडखोरांना पुन्‍हा पक्षात प्रवेश देऊ नका, अशी आग्रही आणि काहीशा चढ्या आवाजात कार्यकर्त्यांनी मागणी केली. एक दोन नव्हे, तर राव यांच्यासमोर तोंड उघडण्याची संधी मिळालेल्या प्रत्येकाने हा मुद्दा आळवलाच. तसेच ज्‍येष्‍ठ नेते व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचे  कार्यकर्तृत्‍व व नेतृत्‍व त्‍यांच्‍यापर्यंत पोहोचविण्‍यात कार्यकर्ते विसरले नाहीत.

कामत वगळता अन्‍य आमदार फिरकतही नाहीत!
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, तीन अपक्ष असतानाही काँग्रेसने सत्ता स्थापनेची संधी घालवली. ‘नेता कोण’ हा गुंता न सुटल्याने भाजपने ऐनवेळी मध्‍यरात्रीनंतर संधी साधत काँग्रेसला आलेली संधी गमवावी लागली. एक एक करत आमदार गळत गेले आणि आता पाच आमदार शिल्लक राहिले आहेत. त्यापैकी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे वगळता इतर चार आमदारांबाबत (रवी नाईक, प्रतापसिंह राणे, लुईझिन फालेरो आणि आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स) यांच्याबाबतची पक्ष नेत्यांत असलेली नाराजीही आजच्या बैठकीत उघड झाली. 

सर्वच नेत्यांनी सांगितले की, दिगंबर कामत हे विरोधी पक्षनेते होण्याआधीपासून संघटनात्मक कामात व पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय आहेत. ते आज विरोधी पक्षनेते झाल्यानंतरही पक्षाचे कार्यक्रम, आंदोलने यात आवर्जून सहभागी होतात. आमच्यासाठी ते सदैव उपलब्ध असतात. इतर चार आमदार पक्ष कार्यालयात शेवटचे कधी आले होते ते त्यांनाही आठवत नसेल, असा टोलाही एक दोघांनी मारला. या आमदारांबाबत अतिशय कडक शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली.

या बैठकीला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह एम. के. शेख, संकल्प आमोणकर, बाबी बागकर, आग्नेल फर्नांडिस, डॉ. प्रमोद साळगावकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. प्रतिमा कुतिन्हो, जनार्दन भंडारी, अमरनाथ पणजीकर, दामोदर शिरोडकर, प्रदीप नाईक, नारायण रेडकर, सचिन परब, धर्मा चोडणकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, शंभू भाऊ बांदेकर, विठोबा देसाई आदी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

राव यांचा प्रथमच गोवा दौरा
श्री. राव यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर चोडणकर व कामत यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी संघटनात्मक कामाची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पणजीत काँग्रेस मुख्यालयात येत काँग्रेसच्या राज्यभरातील प्रमुख नेत्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना राव म्हणाले, मी आधीच गोव्यात येणार होतो. मात्र, मला कोरोनाचा संसर्ग झाला. उपचारानंतर प्रवास करणे सुरक्षित आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर प्रथम गोव्याचा दौरा करत आहे. प्रमुख कार्यकर्ते, जिल्हा व गट पातळीवरील नेत्यांशी मी चर्चा करणार आहे. मी शेजारील राज्यातीलच असल्याने गोव्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मी अधिक वेळ देऊ शकेन, असे वाटते. यापूर्वी कर्नाटकातील मार्गारेट आल्वा, बी. के. हरीप्रसाद आदी नेते गोव्याचे काँग्रेस प्रभारी होते. गोव्याचे स्‍व. शांताराम नाईक हे कर्नाटकाचे प्रभारी होते. त्यामुळे हाच वारसा मी पुढे चालवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT